PM
आंतरराष्ट्रीय

गाझातील युद्ध थांबवण्याचे पोप यांचे आवाहन ;नाताळनिमित्त केलेल्या भाषणात जागतिक शांततेची अपेक्षा

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पत्नी सारा नेतन्याहू यांनी रविवारी पोप फ्रान्सिस यांना पक्ष लिहून हमास-इस्रायल युद्धात मध्यस्थी करण्याची विनंती केली

Swapnil S

व्हॅटिकन सिटी : नाताळनिमित्त सोमवारी केलेल्या जाहीर भाषणात  पोप फ्रान्सिस यांनी गाझा पट्टीत चाललेले हमास-इस्रायल युद्ध तातडीने थांबवण्याचे आवाहन केले. पोप यांनी समस्त जगाला नाताळच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. तसेच जागतिक स्तरावर शांतता आणि समृद्धी नांदण्याची अपेक्षा व्यक्त केली.

इटलीतील रोम शहराच्या अंतर्गत भागात वसलेल्या व्हॅटिकन सिटी या चिमुकल्या स्वतंत्र देशातील सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या सज्जातून सोमवारी पोप फ्रान्सिस  यांनी शहराला आणि जगाला उद्देशून जाहीर भाषण केले. त्यात त्यांनी हमास-इस्रायल संघर्ष तातडीने थांबवण्याचे आवाहन केले. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा पोप यांनी निषेध केला. हमासने सर्व ओलिसांची सुटका करावी, इस्रायलने गाझा पट्टीवरील हल्ले थांबवावेत आणि गाझात मानवतावादी मदत पोहोचवण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन पोप यांनी केले.

गाझाप्रमाणेच युक्रेन, सीरिया, आर्मेनिया, अझरबैजान, येमेन, दक्षिण सुदान, काँगो आणि कोरियन द्वीपकल्पापर्यंत विविध प्रदेशांत सुरू असलेले संघर्ष थांबवले जावेत आणि जगात शांतता नांदावी, अशी अपेक्षा पोप यांनी व्यक्त केली. येशू ख्रिस्त यांच्या बेथेलहेममधील जन्माचे पर्व हा जगासाठी शांततेचा संदेश देणारा काळ आहे. मात्र, यंदा बेथेलहेममध्ये युद्धामुळे दु:खी वातावरण आहे, असेही त्यांनी सांगितले.

पोप फ्रान्सिस यांनी जागतिक शस्त्रास्त्र उद्योगावर टीका केली. त्यांनी जागतिक शस्त्रव्यापाऱ्यांचा उल्लेख मृत्यूचे सौदागर असा केला. हे लोक नफा कमावण्यासाठी जगात अशांतता माजवत आहेत. विविध देशांना एकमेकांशी झुंजवत आहेत. त्यांचे मनसुबे आपण हाणून पाडले पाहिजेत. त्यांच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, असेही पोप म्हणाले.

नेतन्याहू यांच्या पत्नीचे पोपना पत्र

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पत्नी सारा नेतन्याहू यांनी रविवारी पोप फ्रान्सिस यांना पक्ष लिहून हमास-इस्रायल युद्धात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. तसेच हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यावेळी दाखवलेल्या क्रौर्याकडेही लक्ष वेधले. हमासने इस्रायलच्या नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले. महिलांवर बलात्कार केले. लहान मुलांना जिवंत जाळले. अद्याप हमासने इस्रायलच्या १२९ ओलिसांना डांबून ठेवले आहे. त्यांच्यातील अनेकांना तातडीने औषधोपचाराची गरज आहे. मात्र, हमास त्यांना ७८ दिवसानंतरही सोडण्यास तयार नाही. हमासने इस्रायलच्या नागरिकांबाबत दाखवलेले हे क्रौर्य दुसऱ्या महायुद्धावेळी झालेल्या अत्याचारांपेक्षा गंभीर आहे, असे सारा नेतन्याहू यांनी या पत्रात म्हटले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी