आंतरराष्ट्रीय

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे ट्रम्प यांचे संकेत

भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे संकेत देणारे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांनी भारत व अमेरिकेत मोठा व्यापार करार (ट्रेड डील) होणार असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, दोन्ही देशांमध्ये एक व्यापार करार होतोय. यामध्ये खूप कमी टॅरिफ (आयात शुल्क) असेल.

Swapnil S

वॉशिंग्टन : भारतावर कमी आयात शुल्क लादण्याचे संकेत देणारे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ट्रम्प यांनी भारत व अमेरिकेत मोठा व्यापार करार (ट्रेड डील) होणार असल्याचे वक्तव्य केले. ते म्हणाले, दोन्ही देशांमध्ये एक व्यापार करार होतोय. यामध्ये खूप कमी टॅरिफ (आयात शुल्क) असेल. या करारामुळे दोन्ही देशांना जागतिक स्तरावर चांगली कामगिरी व स्पर्धा करण्याची संधी मिळणार आहे.

ट्रम्प म्हणाले की, आपला भारताबरोबर एक करार होणार आहे. हा खूप वेगळ्या प्रकारचा करार असेल. ज्याद्वारे आपल्याला तेथे (भारतात) जाऊन स्पर्धा करता येईल. बाजारपेठेच्या बाबतीत सध्या भारत कोणालाही आपल्या देशात शिरकाव करू देत नाही. जर भारताने आपल्याला तेथे स्पर्धा करण्याची संधी दिली तर खूपच कमी टॅरिफवर भारत व अमेरिकेचा व्यापार करार पूर्ण होईल.

भारत-अमेरिका व्यापार करार ९ जुलैपूर्वी होणार

गेल्या काही दिवसांपासून भारत व अमेरिकेमध्ये द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा चालू आहे. ही चर्चा ९ जुलैपूर्वी पूर्ण होऊन दोन्ही देशांचा करार होणे आवश्यक आहे. कारण ट्रम्प यांनी विविध देशांवर भरमसाठ आयात शुल्क लावले होते. हा निर्णय ९० दिवसांसाठी स्थगित करण्यात आला होता. आता ९ जुलै रोजी ९० दिवस पूर्ण होतील आणि अमेरिका नवे आयात शुल्क लागू करेल. तत्पूर्वी, भारत व अमेरिकेला द्विपक्षीय व्यापार करार पूर्ण करायचा आहे

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त