संग्रहित छायाचित्र 
आंतरराष्ट्रीय

रशियाची विमाने ‘नाटो’ हद्दीत घुसल्यास पाडा! डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

रशियन विमाने ‘नाटो’च्या हवाई हद्दीत घुसली तर त्यांना पाडले पाहिजे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ‘नाटो’ आणि युरोपच्या मदतीने युक्रेन रशियाकडून सर्व व्यापलेले प्रदेश परत मिळवू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Swapnil S

वॉशिंग्टन : रशियन विमाने ‘नाटो’च्या हवाई हद्दीत घुसली तर त्यांना पाडले पाहिजे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. ‘नाटो’ आणि युरोपच्या मदतीने युक्रेन रशियाकडून सर्व व्यापलेले प्रदेश परत मिळवू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. बैठकीनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, युरोप आणि विशेषतः ‘नाटो’च्या मदतीने युक्रेन आपला गमावलेला प्रदेश परत मिळवण्याच्या स्थितीत आहे.

याशिवाय, रशियाची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत अडचणीत आहे. युक्रेन मोठ्या सैन्याला रोखण्याचे चांगले काम करत आहे. हे युद्ध लवकर संपायला हवे होते, पण ते साडेतीन वर्षांपासून सुरू आहे. यामुळे रशियाची प्रतिमा खराब होत आहे, असेही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प म्हणाले की, तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या युद्धामुळे मॉस्को "कागदी वाघ" बनला आहे. ते म्हणाले की, या संघर्षातून असे दिसून येते की कमकुवत नेतृत्व एखाद्या देशाला कसे कमकुवत करू शकते. जर मॉस्कोने तडजोड करण्यास नकार दिला तर अमेरिका कठोर शुल्क लादण्यास तयार आहे.

शहापूर : खालापूरच्या धर्तीवर खुटघर इंटरचेंजचा विकास; मंत्रालय स्तरावर घडामोडी सुरू

पूरग्रस्तांना मदतीचा हात! राज्य शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांची मदत

लडाखमधील हिंसाचारानंतर सोनम वांगचुक CBI च्या रडारवर; NGO ची चौकशी सुरू, संस्थेचा परवाना रद्द

मराठा समाज बांधवांना तूर्तास दिलासा; हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे थांबवा; कुणबी समाजाची मागणी