फोटो : एक्स
आंतरराष्ट्रीय

ब्रिटनमध्ये १४ वर्षांनंतर सत्तांतर! हुजूर पक्षाचा दारुण पराभव, मजूर पक्ष ४०० पार; ऋषी सुनक यांनी केले केइर स्टार्मर यांचे अभिनंदन

Swapnil S

लंडन : ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने (लेबर पार्टी) हुजूर पक्षाचा (कन्झर्व्हेटिव्ह पार्टी) दारुण पराभव केला. बकिंगहॅम पॅलेस येथे राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेतल्यानंतर मजूर पक्षाचे नेते केइर स्टार्मर (६१) शुक्रवारी ब्रिटनचे नवे अधिकृत पंतप्रधान झाले. मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पराभव मान्य करून स्टार्मर यांचे अभिनंदन केले.

मजूर पक्षाचे नेते स्टार्मर यांनी पत्नी व्हिक्टोरिया स्टार्मर यांच्यासह बकिंगहॅम पॅलेस येथे राजे चार्ल्स तिसरे यांची भेट घेतली. हुजूर पक्षाने या निवडणुकीत सर्वात वाईट पराभवाची नोंद केली. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मधील ६५० पैकी ४०० हून अधिक जागा मजूर पक्षाने पटाकावल्या. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये हुजूर पक्षाची कामगिरी असमाधानकारक होणार असल्याचे अंदाज वर्तविण्यात आले होते. त्या पक्षाचे तब्बल २१८ सदस्य पराभूत झाले. स्टार्मर यांनी हुजूर पक्षाची १४ वर्षांची सत्ता संपुष्टात आणली.

ब्रिटनमध्ये १४ वर्षांनंतर सत्तांतर घडले, त्यामध्ये मजूर पक्षाने ४०० हून अधिक जागा जिंकल्या. सुनक यांनी मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका जाहीर केल्या होत्या. मजूर पक्षाने बहुमताची संख्या पार केल्यानंतर सुनक यांनी जनतेची माफी मागत पराभवाचा स्वीकार केला, तर देशात आता बदलाची सुरुवात होईल, असे नवे पंतप्रधान स्टार्मर म्हणाले.

भारतीय वंशाचे २६ जण विजयी

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये प्रथमच भारतीय वंशाचे २६ सदस्य निवडून आले असून त्यामुळे नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?