अमेरिकेचा इराणवर पुढील आठवड्यात पुन्हा हल्ला? मोठया लष्करी कारवाईची तयारी सुरू संग्रहित छायाचित्र
आंतरराष्ट्रीय

अमेरिकेचा इराणवर पुढील आठवड्यात पुन्हा हल्ला? मोठया लष्करी कारवाईची तयारी सुरू

गेले महिनाभर अमेरिका व इराणमध्ये सुरू असलेला युद्धविराम लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत.

Swapnil S

न्यूयॉर्क : गेले महिनाभर अमेरिका व इराणमध्ये सुरू असलेला युद्धविराम लवकरच संपण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिका पुढील आठवड्यात इराणवर पुन्हा लष्करी हल्ला करण्याची तयारी करत आहे, असे वृत्त 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिले आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय 'पेंटागन'ने या हल्ल्यासाठी अनेक पर्याय तयार केले असून, आता अंतिम निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घ्यायचा आहे. दोन्ही देशांमधील शांतता वाटाघाटी न कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचल्यामुळे सैनिकी कारवाईद्वारे इराणवर दबाव आणता येऊ शकतो, असे अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकन आणि इस्रायलचे अधिकारी पुढील आठवड्यात इराणविरुद्ध हल्ले पुन्हा सुरू करण्यासाठी तयारीत गुंतले आहेत.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी काँग्रेससमोर साक्ष देताना खासदारांना सांगितले की, गरज पडल्यास लष्करी कारवाई वाढवण्याची योजना तयार आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लष्करी योजनेत प्रामुख्याने तीन पर्यायांचा समावेश आहे. पहिल्या पर्यायांतर्गत इराणच्या लष्करी आणि पायाभूत सुविधांच्या ठिकाणांवर मोठे हवाई हल्ले केले जाऊ शकतात. दुसऱ्या पर्यायात अमेरिकन स्पेशल ऑपरेशन फोर्सेसना जमिनीवर उतरवून इस्फहान अणुऊर्जा प्रकल्पाखाली दडवून ठेवलेले समृद्ध युरेनियम नष्ट करण्याची मोहिम हाती घेतल्याचे वृत्त आहे. ही मोहीम अत्यंत जोखीमयुक्त असून यात मोठे लष्करी नुकसान होऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. तिसऱ्या पर्यायानुसार अमेरिकी सेना खर्ग बेटावर ताबा मिळवू शकते, जे इराणच्या तेल निर्यातीचे मुख्य केंद्र आहे. मात्र खर्ग बेटावर ताबा राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सैनिकांची आवश्यकता भासणार आहे. इराणला तेथील भौगोलिक परिस्थितीचा मिळणारा फायदा अमेरिकेच्या अडचणी वाढवू शकतो.

प. आशियात ५० हजार सैनिक तैनात अमेरिकेने या मोहिमेसाठी प. आशियात ५० हजारांपेक्षा जास्त सैनिक, दोन विमान वाहू युद्धनौका, १२ विनाशिका, लढाऊ विमाने तैनात आहेत. सुमारे ५ हजार मरीन आणि ८२ व्या एअरबॉर्न डिव्हिजनचे २ हजार पॅरादूपर्सही आदेशाची प्रतीक्षा करत आहेत.

मान्सूनवर सुपर एल-निनोचे सावट; पाऊस घटणार, देशात दुष्काळाचा धोका

CBSE शाळांमध्ये तीन भाषा शिकणे सक्तीचे; नववी, दहावीसाठी सुधारीत भाषा धोरण जाहीर, दोन भारतीय भाषा बंधनकारक

पटेल आणि तटकरे पदांवर कायम; 'राष्ट्रवादी'चे स्पष्टीकरण

Weather Update : अंदमानात पाऊस आला, कोकणात ६ जूनला

आजचे राशिभविष्य, १७ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत