लाईफस्टाईल

दुपारची झोप : आराम की आरोग्याचा धोका? हार्वर्डच्या संशोधनातून धक्कादायक निष्कर्ष

दिवसभराच्या कामामुळे थकलेलं शरीर दुपारी काही मिनिटं झोपून घेतलं तर ताजेतवाने वाटतं. अनेकांना ही रोजची सवय आहे. विशेषतः घरात काम करणाऱ्या महिला किंवा वयस्कर व्यक्ती दुपारच्या डुलकीनंतर फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागतात.

नेहा जाधव - तांबे

दिवसभराच्या कामामुळे थकलेलं शरीर दुपारी काही मिनिटं झोपून घेतलं तर ताजेतवाने वाटतं. अनेकांना ही रोजची सवय आहे. विशेषतः घरात काम करणाऱ्या महिला किंवा वयस्कर व्यक्ती दुपारच्या डुलकीनंतर फ्रेश होऊन पुन्हा कामाला लागतात. पण, हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार ही सवय जितकी सुखद वाटते, तितकीच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

दुपारची झोप आणि हृदयाचे आजार

संशोधनात दिसून आलं की, दररोज दुपारी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये हृदयरोगाचा धोका जास्त असतो. झोपेनंतर अचानक रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके अनियमित होतात. विशेषतः ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोप घेणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो.

मेटाबॉलिज्मवर वाईट परिणाम

दुपारची गाढ झोप शरीराच्या ऊर्जा खर्च करण्याच्या प्रक्रियेवर म्हणजेच मेटाबॉलिज्मवर नकारात्मक परिणाम करते.

  • लठ्ठपणाची शक्यता वाढते

  • रक्तातील साखर अनियंत्रित राहते

  • इन्सुलिन रेसिस्टेंसचा धोका वाढतो

  • यामुळे शरीरात चरबी साठू लागते आणि वजन वाढण्याची समस्या तीव्र होते.

मानसिक आरोग्यावर परिणाम

हार्वर्डच्या रिपोर्टनुसार, दिवसा झोप घेणाऱ्यांमध्ये मानसिक ताण, डिप्रेशन आणि थकवा अधिक दिसून येतो. कारण झोपेमुळे मेंदूचा अलर्टनेस कमी होतो, मूड स्विंग्स वाढतात आणि सतत सुस्ती जाणवते.

किती वेळ झोप घेणं सुरक्षित?

तज्ज्ञांच्या मते, १० ते २० मिनिटांची पॉवर नॅप ही शरीरासाठी फायदेशीर ठरते. यामुळे थोडा आराम मिळतो, पण गाढ झोप न लागल्याने रात्रीच्या झोपेवर परिणाम होत नाही. मात्र, ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपणे धोकादायक ठरू शकते.

दुपारच्या झोपेचे फायदेही आहेत का?

  • कमी वेळ झोपल्यास स्मरणशक्ती वाढते

  • एकाग्रता आणि काम करण्याची क्षमता सुधारते

  • थकवा कमी होतो

पण या फायद्यांसाठी झोपेचा कालावधी मर्यादित ठेवणं आवश्यक आहे.

(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली