Ambedkar Jayanti 2026 : १४ एप्रिल स्पेशल क्रीमी राईस खीर; घरीच बनवा सोपी रेसिपी 'एआय' ने बनविलेली प्रतिमा
लाईफस्टाईल

Ambedkar Jayanti 2026 : १४ एप्रिल स्पेशल क्रीमी राईस खीर; घरीच बनवा सोपी रेसिपी

१४ एप्रिल निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आवडणारी भाताची खीर घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी, क्रीमी आणि स्वादिष्ट रेसिपी.

किशोरी घायवट-उबाळे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) निमित्त अनेकजण त्यांच्या आवडीच्या पदार्थांची आठवण काढतात. काही संदर्भांनुसार, बाबासाहेबांना साधे पण चविष्ट पदार्थ प्रिय होते. त्यामध्ये भाताची खीर हा एक खास आवडता पदार्थ होता. त्यामुळे जयंतीच्या निमित्ताने घरीच सहज आणि पटकन तयार होणारी क्रीमी, गोड आणि पारंपरिक 'राईस खीर' बनवून हा दिवस अधिक खास करता येईल.

साहित्य :

  • तांदूळ (सुमारे ५० ग्रॅम) - १ कप

  • दूध - १ लिटर

  • कंडेन्स्ड मिल्क (Milkmaid) - १ कप

  • वेलची पूड - अर्धा टीस्पून

  • सुका मेवा (काजू, बदाम, मनुका) - ३ टेबलस्पून

कृती :

तांदूळ स्वच्छ धुवून १५ ते २० मिनिटे भिजत ठेवा. एका भांड्यात दूध घेऊन त्यात तांदूळ घालून मंद आचेवर शिजवा (किंवा प्रेशर कुकरमध्ये १० मिनिटे शिजवू शकता). तांदूळ मऊ झाल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून ५ ते ७ मिनिटे सतत ढवळत शिजवा. खीर घट्ट होत आली की गॅस बंद करा. शेवटी वेलची पूड आणि काजू, बदाम, मनुका घालून सजवा. गरम किंवा थंड सर्व्ह करा.

टिप्स :

  • तांदूळ आधी भिजवल्यास खीर लवकर आणि एकसारखी शिजते.

  • दूध खाली लागू नये म्हणून मंद आचेवर शिजवा आणि सतत ढवळत रहा.

  • अधिक क्रीमी टेक्स्चर हवे असल्यास काही तांदळाचे दाणे हलकेच मॅश करा.

  • सर्व्ह करण्याआधी थोडा वेळ ठेवल्यास खीर अधिक घट्ट आणि स्वादिष्ट लागते.

  • सणासाठी सजावट करताना चांदीचा वर्ख किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करू शकता.

Mumbai : भुलेश्वर, गिरगावात बुलडोझर; एसव्हीपी रोडवरील फुटपाथ अतिक्रमणांवर हातोडा, तीन मोठ्या लॉरी भरून साहित्य हटवले

जिल्हा, न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागणीला पाठिंबा; महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेचा निर्णय

रायगडमध्ये विहिरीवरच्या दहीहंडीचा अनोखा थरार; हंडी फोडण्यासाठी गोविंदांचे कसब पणाला; कुर्डस गावाची २४ वर्षांची परंपरा

Mumbai : ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया होणार; सुक्या कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन शक्य

हेरगिरीसाठी भावी अग्निवीरांवर पाकचे जाळे; भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरू