रक्षाबंधन सणासह सणासुदीच्या काळाला सुरूवात होते. हा सण भावा-बहिणीमधील प्रेमळ नात्याला साजरा करतो, जेथे बहिणी आपल्या भावांचे आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ त्यांच्या बहिणींना पाठिंबा देण्यासोबत संरक्षण करण्याचे, तसेच त्यांचे आरोग्य व आनंदाची काळजी घेण्याचे वचन देतात. या हृदयस्पर्शी कटिबद्धतेला सन्मानित करण्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारामध्ये बदामांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करत यंदाचा रक्षाबंधन सण अधिक खास करा.
सण साजरीकरणादरम्यान गोड पदार्थांचा व अनारोग्यकारक स्नॅक्सचा मनसोक्त आस्वाद घेणे स्वाभाविक आहे, ज्याचा तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. गोड व तेलकट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्याने गंभीर आरोग्यविषयक आजार होऊ शकतात, जसे मधुमेह, लठ्ठपणा व कार्डियोव्हॅस्कुलर समस्या. ज्यामुळे योग्य आहार निवडी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
म्हणून, तुम्ही तुमच्या कुटुंबियांसाठी उत्सवी मिष्टान्ने व स्पेशल डिशेस् तयार करत असताना बदामांसारख्या आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करण्याची खात्री घ्या. बदाम अत्यंत पौष्टिक आहेत आणि रक्तातील शर्करेच्या पातळ्यांचे व्यवस्थापन करण्यामध्ये, एलडीएल व एकूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यामध्ये मदत करू शकतात, तसेच हृदयाचे आरोग्य व एकूण स्वास्थ्य उत्तम ठेवण्यास साह्य करू शकतात. याव्यतिरिक्त, रिफइान्ड साखरेऐवजी नैसर्गिक स्वीटनर्सचा वापर करा आणि तळलेल्या पदार्थांऐवजी बेक केलेल्या पदार्थांचे सेवन करा. हे विचारशील बदल करत तुम्ही प्रियजनांसोबत सण साजरीकरणाचा आनंद घेऊ शकता, तसेच तुमच्या आरोग्याची काळजी देखील घेऊ शकता.
रक्षाबंधन साजरा करण्याच्या स्वत:च्या पद्धतीबाबत सांगताना बॉलिवुड अभिनेत्री सोहा अली खान म्हणाल्या, “रक्षाबंधन माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी खास दिवस आहे. दरवर्षी, आम्ही एकत्र येत सण साजरा करतो आणि प्रथेचे पालन करत एकत्र जेवणाचा आस्वाद घेतो. माझे कुटुंबिय आणि मी सेवन करणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत काळजी घेत मी दरवर्षी स्पेशल डिसर्ट ‘ग्रिल्ड आल्मंड बर्फी' तयार करते, जी स्वादिष्ट असण्यासोबत आरोग्यदायी देखील आहे. मी इतर पाककलांमध्ये देखील बदामांसारख्या आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करते. ते स्वादिष्ट असण्यासोबत आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी देखील आहेत.''
दिल्लीमधील मॅक्स हेल्थकेअरच्या डायटेटिक्सच्या प्रादेशिक प्रमुख रितिका समाद्दार म्हणाल्या, “रक्षाबंधन सारख्या सणांदरम्यान लोक अनारोग्यकारक खाद्यपदार्थांचे सेवन करतात, जेथे त्यांना अशा खाद्यपदार्थांचे त्यांचे आरोग्य व वजनावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबाबत माहित नसते. मी बदामांसारख्या खाद्यपदार्थांची निवड करत व आरोग्याची काळजी घेत सणांचा आनंद घेण्याची शिफारस करते. बदामांमध्ये आवश्यक पौष्टिक घटक असतात आणि अनारोग्यकारक स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरू शकतात किंवा विविध डिशेसमध्ये समाविष्ट करत त्यांना आरोग्यदायी करता येऊ शकते. यंदा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने जारी केलेले डाएटरी गाइडलाइन्स फॉर इंडियन्स बदामांना पौष्टिक नट मानते, जे आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज सेवन करता येऊ शकतात. ही मार्गदर्शकतत्त्वे संतुलित आहाराचा भाग म्हणून दररोज बदामांचे सेवन करण्याची शिफारस करतात, जे प्लांट प्रोटीनचे स्रोत आणि आरोग्यदायी स्नॅक आहेत.''
न्यूट्रिशन व वेलनेस कन्सल्टण्ट शीला कृष्णास्वामी म्हणाल्या, “रक्षाबंधन सणाला गोड पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला जातो. पण, अनेक लोक त्यांच्या रक्तातील शर्करेच्या पातळ्यांवर आणि एकूण आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करतात. गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे ग्लुकोज पातळ्यांवर वारंवार चढ-उतार होतात, विशेषत: मधुमेह किंवा प्री-डायबेटिस असलेल्या व्यक्तींवर प्रतिकूल परिणाम होतो. अनुभवी न्यूट्रिशनिस्ट म्हणून मी बदाम, ताजी फळे यांसारख्या नैसर्गिक, आरोग्यदायी खाद्यपदार्थांचा अवलंब करत नियंत्रितपणे आस्वाद घेण्याची शिफारस करते. बदामांमध्ये प्रथिने व डायटरी फायबर संपन्न प्रमाणात असतात, जे रक्तातील शर्करेच्या पातळ्या आरोग्यदायी राखण्यास मदत करतात. तसेच, आरोग्यदायी आहारामध्ये बदामांचा समावेश केल्याने ग्लायसेमिक व कार्डियोव्हॅस्कुलर उपायांमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते, ज्यामधून टाइप २ डायबेटिस आणि प्री-डायबेटिसने पीडित भारतीयांचे आरोग्य उत्तम राहू शकते.''
स्किल एक्स्पर्ट व कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. गीतिका मित्तल गुप्ता म्हणाल्या, “गोड व तेलकट पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्वचेच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. साजरीकरणादरम्यान लोक या पदार्थांच्या त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत विचार न करता मनसोक्त आस्वाद घेतात. म्हणून, सणांदरम्यान आपण सेवन करणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मी बदामांसारख्या नैसर्गिक खाद्यपदार्थ पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्याची शिफारस करते, जे स्वादिष्ट असण्यासोबत अत्यंत पौष्टिक देखील आहे. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई आणि आरोग्यदायी फॅट्स संपन्न प्रमाणात असतात, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासोबत उत्तम राहते. तसेच, दररोज बदाम सेवन केल्याने त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून (यूव्हीबी किरण) संरक्षण होण्यास आणि त्वचेची पोत सुधारण्यास मदत होऊ शकते.''
तर मग, यंदा रक्षाबंधनला साजरीकरण आनंददायी व आरोग्यदायी असण्याची खात्री घेण्यासाठी विचारशील आणि स्मार्ट आहार पर्यायांची निवड करूया.