लाईफस्टाईल

Christmas Special : यंदा ख्रिसमसला बनवा टेस्टी होममेड चॉकलेट्स!

सध्या सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह दिसून येत आहे. पेस्ट्री, केक, आकर्षक डेकोरेशन, गिफ्ट्स आणि गोड पदार्थांनी बाजारपेठा सजल्या आहेत. या सगळ्यात चॉकलेट्स तर हक्काचं! दुकानात सहज मिळत असली, तरी या वर्षी काहीतरी वेगळं करून पाहा, ही चॉकलेट्स घरच्या घरीच बनवा आणि तुमच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला एक स्पेशल होममेड टच द्या.

Mayuri Gawade

डिसेंबर महिना आला की सर्वात आधी आठवतो तो ख्रिसमसचा सण. सध्या सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह दिसून येत आहे. पेस्ट्री, केक, आकर्षक डेकोरेशन, गिफ्ट्स आणि गोड पदार्थांनी बाजारपेठा सजल्या आहेत. या सगळ्यात चॉकलेट्स तर हक्काचं! दुकानात सहज मिळत असली, तरी या वर्षी काहीतरी वेगळं करून पाहा, ही चॉकलेट्स घरच्या घरीच बनवा आणि तुमच्या ख्रिसमस सेलिब्रेशनला एक स्पेशल होममेड टच द्या. अगदी मोजक्या घरगुती साहित्यांचा वापर करून आपण हा केक तयार करू शकता.

साहित्य :

  • नारळ तेल किंवा कोकाआ बटर - पाऊण कप

  • व्हॅनिला इसेन्स - 1 चमचा

  • दुधाची पावडर - पाव कप

  • कोको पावडर - पाऊण कप

  • साखर - चवीप्रमाणे

  • सिलिकॉन मोल्ड / बर्फाचा साचा - चॉकलेट सेट करण्यासाठी

कृती :

सर्वप्रथम गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी चांगले गरम झाल्यावर त्यावर एक मोठा वाडगा ठेवा (डबल बॉयलर पद्धत). त्यानंतर या वाडग्यात नारळ तेल किंवा कोकाआ बटर घालून वितळू द्या. नंतर त्यात साखर, कोको पावडर आणि दुधाची पावडर घाला. त्यानंतर व्हॅनिला इसेन्स घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत नीट मिक्स करा. मिश्रण गुळगुळीत आणि एकसारखे झालं की ते तयार आहे.

तयार मिश्रण आपल्या आवडीच्या डिझाइनच्या सिलिकॉन मोल्डमध्ये भरा. मोल्डचं मिश्रण समतोल बसण्यासाठी हलक्या हाताने हलवा. त्यानंतर मोल्ड दोन तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. चॉकलेट सेट झाल्यावर ते हळू मोल्डमधून बाहेर काढा. तळापासून हलका दाब देत चॉकलेट पुढे ढकलल्यास ते सहज बाहेर येतात. इच्छा असल्यास यावर पिठी साखर भुरभुरा.

झाले तुमचे स्वादिष्ट होममेड चॉकलेट्स तयार! आवडत्या व्यक्तीस भेट देण्यासाठी एका सुंदर बॉक्समध्ये पॅक करा आणि तुमच्या ख्रिसमसला द्या घरगुती गोडीची खास भेट!

Nerul–Mumbai Ferry : फक्त ३० मिनिटांत मुंबई! १५ डिसेंबरपासून नेरुळ-भाऊचा धक्का फेरी सुरू होणार; भाडे किती? जाणून घ्या डिटेल्स

Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

लाज आणली! महिला डॉक्टरांचा स्पर्श व्हावा यासाठी आजारपणाचं नाटक; कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाला अटक

IND vs SA : सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना

परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले