केळी हे एक सुपरफ्रूट (Banana Superfruit) आहे. केळी खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. जसे की पचन क्षमता सुधारते, रक्तदाब नियंत्रण, हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते, शरीराला लगेच ऊर्जा प्रदान करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हिमोग्लोबीन वाढव्यासाठी सर्वोत्तम फळ म्हणजे केळी. मात्र, केळी खाण्याचे काही नियम आहेत. काही पदार्थांसोबत केळी (Wrong Combination with banana) खाल्ल्यास त्याचे फायदे होण्याऐवजी आरोग्यावर दुष्परिणामच संभवतात. जाणून घ्या कोणत्या पदार्थांसोबत केळी खाऊ नये...
दूध (Milk & Banana Wrong)
केळी हे गरम दुधासोबत कधीही खाऊ नये. केळी आणि दूध एकत्र हे आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार आहे. यामुळे शरीरात विष तयार होऊ शकते. त्यामुळे केळी दुधासोबत कधीही खाऊ नये. यामुळे त्वचेचे विकार वाढतात. तसेच शरीरात कफ प्रवृत्ती वाढू शकते. बनाना मिल्कशेक हे देखील आरोग्यावर दुष्परिणाम करू शकते.
दही (Curd & Banana)
दुधाप्रमाणेच दह्यासोबतही केळी जास्त मोठ्या प्रमाणात खाऊ नये. जरी दूध आणि दह्याचे गुणधर्म वेगवेगळे असतले तरी दही आणि केळी हे दोन्हीही थंड गुणधर्माचे असतात. याचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे कफ प्रवृत्तीचे आजार वाढू शकतात. जसे की सर्दी होणे, छातीत आणि घशात कफ वाढणे इत्यादी. त्यामुळे दही आणि केळी हे क्वचितप्रसंगी कडक उन्हात कमी प्रमाणातच खाऊ शकतात.
सिट्रस फळे
हल्ली फ्रूट सॅलड किंवा फ्रूट फ्लेट खाताना सर्वच फळे एकत्र करून खाल्ली जातात. मात्र, हे आरोग्यासाठी हानिकारक असते. जीवनसत्त्व सी किंवा अॅसिडिक फळे केळीसोबत खाऊ नये. उदाहरणार्थ संत्री, मोसंबी इत्यादी... यामुळे शरीरात अपचन होणे, गॅस तयार होणे, पोट फुगणे असे आजार होतात.
मांसाहार केल्यानंतर केळी खाऊ नये
मांसाहार केल्यानंतर शक्यतो केळी खाणे टाळावे. कारण मांसाहारी पदार्थात उच्चपातळीची प्रथिने असतात. त्यामुळे मांसाहारानंतर केळी खाल्ल्यास पोट जड होऊन अपचन होण्याचा त्रास होऊ शकतो.
केळी कधी खाणे योग्य ठरते?
उन्हाळा सुरू आहे. दुपारच्या वेळी जेवण झाल्यानंतर तासाभराने केळी खाणे हे आरोग्यासाठी योग्य असते.
(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असते.)