आजकाल फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईलचा ट्रेंड वाढताना दिसतोय. अशा वेळी आपल्या डाएटमध्ये एक फळ सातत्याने दिसतं, ते म्हणजे ड्रॅगन फ्रूट! दिसायला आकर्षक आणि चवीला गोड असलेलं हे फळ फक्त पौष्टिक नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीसाठीही उपयुक्त आहे.
दक्षिण अमेरिकेतून जगभर पसरलेलं हे फळ 'पिटाह्या' या नावानेही ओळखले जाते. सॅलड, जॅम, जेली किंवा शेकच्या स्वरूपात याचे सेवन केले जाते. यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात, जे शरीराचं संतुलन राखतात.
याचे काही जबरदस्त फायदे पुढीलप्रमाणे-
मधुमेहासाठी लाभदायी - ड्रॅगन फ्रूटमधील फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक ऍसिड रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. नियमित सेवन केल्याने डायबेटीसचा धोका कमी होतो.
हृदय आणि कोलेस्ट्रॉलसाठी उपयोगी - यातील ओमेगा ३ आणि ओमेगा ९ फॅटी ऍसिड्स हृदय निरोगी ठेवतात. यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढतात.
मेंदूला तंदुरुस्त ठेवते - ड्रॅगन फ्रूटच्या नियमित सेवनाने अल्झायमर आणि पार्किन्सन्ससारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
कर्करोगापासून संरक्षण - अँटीट्यूमर आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे ड्रॅगन फ्रूट स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते.
सांधेदुखीपासून आराम - यातील अँटीऑक्सिडंट्समुळे संधिवात किंवा जळजळीमुळे होणाऱ्या वेदना कमी होतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते - व्हिटॅमिन सी आणि कॅरोटीनोइड्समुळे शरीर संसर्गांपासून लढण्यास अधिक सक्षम बनतं.
थोडक्यात सांगायचं झालं, तर ड्रॅगन फ्रूट हे आरोग्य, सौंदर्य आणि ऊर्जेचं एक संपूर्ण पॅकेज आहे. आहारात याचा समावेश करा आणि शरीराला नैसर्गिक पोषण द्या!
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य माहितीवर आधारित आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)