लाईफस्टाईल

'या' उपायाने होईल डोळ्यांचा ताण कमी; मोबाईल-लॅपटॉप वापरणाऱ्यांसाठी ठरेल फायदेशीर

सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येणे, जळजळ होणे, कोरडेपणा जाणवणे अशा समस्या अनेकांना भेडसावत आहेत. तज्ज्ञांच्या मते, यासाठी एक सोपा उपाय आहे, ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकेल.

किशोरी घायवट-उबाळे

आजच्या डिजिटल युगात मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर प्रचंड वाढला आहे. सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येणे, जळजळ होणे, कोरडेपणा जाणवणे अशा समस्या अनेकांना भेडसावत आहेत. तज्ज्ञांच्या मते, यासाठी एक सोपा उपाय आहे, ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकेल.

डोळे कोरडे पडत नाहीत

तज्ज्ञांच्या मते डोळे मिचकावण्याची साधी सवय डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. डोळे मिचकावल्यामुळे डोळ्यांत नैसर्गिकरित्या अश्रू पसरतात, ज्यामुळे डोळ्यांना आवश्यक ओलावा मिळतो. यामुळे डोळे कोरडे पडत नाहीत आणि जळजळ कमी होते. तसेच, सतत स्क्रीन पाहिल्याने येणारा डोळ्यांचा थकवा कमी होण्यासही मदत होते.

डोळ्यांच्या संसर्गाचा धोका कमी होतो

डोळे मिचकावल्याने डोळ्यांत गेलेली धूळ, घाण आणि बॅक्टेरिया बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका कमी होतो. नियमित मिचकावल्याने डोळे स्वच्छ राहतात आणि डोळ्यांचे एकूण आरोग्य सुधारते.

डोळ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ

तज्ज्ञ सांगतात की, मिचकावण्याच्या प्रक्रियेमुळे डोळ्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यामुळे डोळ्यांची कार्यक्षमता वाढते आणि डोळ्यांवरील ताण कमी होतो. मायग्रेन, डोळे दुखणे, लालसरपणा यांसारख्या तक्रारींवरही याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.

डोळ्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकेल

कामाच्या दरम्यान तुम्हाला शक्य होईल तसे जाणीवपूर्वक डोळे मिचकावण्याची सवय लावल्यास डोळ्यांचे आरोग्य दीर्घकाळ टिकवता येऊ शकते. विशेषतः ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि मोबाईलचा जास्त वापर करणाऱ्यांनी ही सवय आवर्जून अंगीकारावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा! १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समितीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान

मतदार यादीत नाव सापडत नाहीये? BMC ने हेल्पलाईन क्रमांक केला जारी

Mumbai : ५ कोटींच्या खंडणीसाठी RTI कार्यकर्त्याची आंध्रच्या खासदाराला धमकी; पीएला चाकू दाखवत ७० हजारही लुटले, मुंबईतून अटक

'२५ वर्षे झाली, मला सोडा'; अबू सालेमच्या मागणीवर SC चा सवाल- २००५ पासून गणना कशी केली? नियमांबाबत स्पष्टीकरणही मागवले

KDMC Election : पुणेरी पाटी टाईप संदेशाने सर्वांचीच करमणूक; अख्ख्या बिल्डिंगचे मत केवळ यांनाच