Freepik 
लाईफस्टाईल

Mother's Day 2024: यंदाच्या 'मदर्स डे'ला घरापासून लांब आहात? या प्रकारे आईला द्या सरप्राईझ!

Happy Mother's Day: मदर्स डे अर्थात मातृदिन दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस आईला समर्पित असतो. हा खास दिवस अजून खास बनवण्यासाठी आईला सरप्राईझ द्या.

Tejashree Gaikwad

Long distance gift ideas for mothers day: अनेकदा मुलांना नोकरी किंवा शिक्षणासाठी घरापासून दूर राहावे लागते. कुटुंबापासून लांब राहणे फार अवघड असते. यामध्ये आपण आपल्या आईला सर्वात जास्त मिस करतो. याच दरम्यान आता मदर्स डे जवळ आला आहे. यादिवशी तर आईची अजून जास्त आठवण येते. जेव्हा आई जवळ असते तेव्हा तिला प्रेमाने मिठी मारणे आणि मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या तरी तिच्या चेहऱ्यावर हास्य येते. पण, जेव्हा तुम्ही तुमच्या आईपासून दूर असता, तेव्हा तिच्यासाठी हा दिवस कसा खास बनवायचा याबद्दल तुम्हाला प्रश्न पडला असेल. आईचे प्रेम, त्याग आणि समर्पणाचे कौतुक करण्यासाठी दरवर्षी मदर्स डे साजरा केला जातो. यंदा १२ मे रोजी मदर्स डे साजरा केला जाणार आहे. जर तुम्ही मदर्स डेच्या दिवशी तुमच्या आईपासून लांब राहत असाल तर इथे जाणून घ्या तिच्यासाठी मदर्स डे कसा खास बनवायचा जेणेकरून तिला हे अंतरही जाणवणार नाही.

आवडणारी गोष्ट पाठवा

आजकाल वेगवेगळ्या ई-कॉमर्स ॲप्समुळे सर्वकाही सोपे झाले आहे. याचाच तुम्हीही फायदा करून घ्या. तुम्ही तुमच्या आईला आवडणारा पदार्थ, आवडती वस्तू पाठवू शकता. याशिवाय तुम्ही तिला फुलं किंवा आवडीचा खायचा पदार्थ पाठवू शकता.

सुंदर मेसेज पाठवा

हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. आपल्या आईला जास्त काही नाही दिलं तरी वाईट वाटतं नाही. तिला २ चांगल्या ओळी बोलल्या किंवा पाठवल्या तरी छान वाटते. मदर्स डेच्या दिवशी आपण अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट टाकतो. पण यंदाच्या मदर्स डेला तुम्ही मुलं अनेकदा व्हॉट्सॲप किंवा इन्स्टाग्रामवर त्यांच्या वैयक्तिक चॅटवर काहीतरी खास पाठवा. लक्षात या यासाठी इंटरनेटवर काही शोधू नकात. तुमच्या मनात आई विषयी जे आहे ते लिहा आणि आईला पाठवा. पण जर तुम्हाला असं लिहता येत नसेल तर तुमच्या आईसोबत घालवलेल्या वेवेगळ्या क्षणांबद्दल लिहा आणि तिला पाठवा.

सेल्फ केअर आणि ग्रूमिंग

तुम्ही मदर्स डे निमित्त तुमच्या आईच्या सेल्फ केअरसाठी छान प्लॅन करा. तुम्ही घराजवळील स्पा किंवा पार्लरमध्ये त्यांच्यासाठी अपॉइंटमेंट घेऊ शकता. आईला हेअर स्पा, नेल आर्ट, वॅक्सिंग, हेअर कलर किंवा पेडीक्योर असं पूर्ण पॅकेज बनवून अपॉइंटमेंट घ्या.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी