Ganesh Chaturthi 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी ट्राय करा 'हे' स्पेशल मोदक; जाणून घ्या रेसिपी  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi 2026 : यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पासाठी ट्राय करा 'हे' स्पेशल मोदक; जाणून घ्या रेसिपी

पारंपरिक उकडीच्या मोदकासोबतच सध्या मोदकाचे अनेक हटके प्रकारही लोकप्रिय झाले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात तुम्हालाही बाप्पासाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर हे ६ प्रकार नक्की ट्राय करा.

किशोरी घायवट-उबाळे

गणेश चतुर्थीचा उत्सव यंदा १४ सप्टेंबरपासून सुरू होणार असून २५ सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने पूजा केली जाते. बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध गोड पदार्थ तयार केले जातात. त्यात सर्वाधिक लोकप्रिय असतो तो म्हणजे मोदक. पारंपरिक उकडीच्या मोदकासोबतच सध्या मोदकाचे अनेक हटके प्रकारही लोकप्रिय झाले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात तुम्हालाही बाप्पासाठी काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर हे ६ प्रकार नक्की ट्राय करा.

१. केसर मोदक - मोदक म्हटलं की बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणून त्याची खास ओळख आहे. पारंपरिक मोदकाला केशराची सुगंधी आणि स्वादिष्ट जोड देऊन केसर मोदक तयार करता येतो. केशरामुळे मोदकाला आकर्षक रंग, सुगंध आणि खास चव मिळते. गणेशोत्सवातील नैवेद्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

२. ड्राय फ्रूट्स मोदक - आरोग्यदायी आणि चविष्ट पर्याय हवा असेल तर ड्राय फ्रूट्स मोदक करून पाहा. अंजीर आणि खजूर यांचा नैसर्गिक गोडवा वापरून हा मोदक तयार करता येतो. त्यात बारीक चिरलेले बदाम, काजू, पिस्ता यांसारखे ड्राय फ्रूट्स मिसळून मोदकाचा आकार देता येतो. विशेष म्हणजे हा प्रकार तुलनेने झटपट तयार होतो.

३. पिस्ता मोदक - पिस्त्याची चव आवडणाऱ्यांसाठी पिस्ता मोदक खास पर्याय आहे. पिस्ता आणि भिजवलेल्या बदामांपासून हा स्वादिष्ट मोदक तयार केला जातो. वरून केशराच्या काड्यांनी सजावट केल्यास त्याचा लूक आणखी आकर्षक दिसतो. सणाच्या मेनूमध्ये हा मोदक नक्कीच उठून दिसेल.

४. नाचणी मोदक - पारंपरिक मोदकाला पौष्टिक ट्विस्ट द्यायचा असेल तर नाचणीचे मोदक करून पाहा. नाचणीच्या पिठाला तुपात भाजून त्यात गूळ आणि वेलची मिसळून सारण तयार केले जाते. चवीसोबत पौष्टिकतेचा विचार करणाऱ्यांसाठी हा मोदक एक वेगळा पर्याय ठरू शकतो.

५. पान गुलकंद मोदक - पानाची ताजी चव आणि गुलकंदाचा गोडवा आवडत असेल तर पान गुलकंद मोदक नक्की ट्राय करा. खवा, पानाची पाने आणि गुलकंद यांच्या मिश्रणातून हा मोदक तयार केला जातो. पारंपरिक मोदकापेक्षा वेगळी चव हवी असल्यास हा प्रकार पाहुण्यांनाही नक्की आवडू शकतो.

६. गुलाब मोदक - गुलाब मोदक हा दिसायला आकर्षक आणि चवीला सुगंधी असतो. खवा, गुलाब इसेन्स आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून हा मोदक तयार करता येतो. मऊ, क्रीमी टेक्स्चर आणि गुलाबाचा सुगंध यामुळे गणेशोत्सवाच्या नैवेद्याला या मोदकामुळे खास टच मिळतो.

बाप्पाच्या नैवेद्यासाठी यंदा काहीतरी वेगळं

उकडीच्या पारंपरिक मोदकासोबतच या हटके प्रकारांमुळे यंदाच्या गणेशोत्सवातील गोड पदार्थांच्या मेनूमध्ये विविधता आणता येईल. केसर, ड्राय फ्रूट्स, पिस्ता, रागी, पान-गुलकंद आणि गुलाब अशा वेगवेगळ्या चवींचे मोदक घरच्या घरी तयार करून बाप्पाला नैवेद्य दाखवता येईल.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण