Friendship Day 2024 Wishes  Representational Image
लाईफस्टाईल

Happy Friendship Day 2024 Wishes In Marathi: 'फ्रेंडशिप डे'च्या शुभेच्छा देत मित्रांसोबत साजरा करा हा खास दिवस!

Friendship Day Facebook Messages, WhatsApp Status: फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा ४ ऑगस्टला हा खास दिन साजरा केला जाणार आहे.

Tejashree Gaikwad

Happy Friendship Day 2024: कुटुंबानंतर माणूस जे पहिले नाते निर्माण केले त्याला मैत्री म्हणतात. कुटुंबाबाहेर, मित्र हा तुमचा मार्गदर्शक, सल्लागार, हितचिंतक असतो. या मैत्रीला एक खास दिवस समर्पित करण्यात आला आहे, जो फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. फ्रेंडशिप डे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा ४ ऑगस्टला हा खास दिन साजरा केला जाणार आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर अशा सोशल मीडियावर मैत्रीचा हा दिवस साजरा करण्यासाठी आम्ही काही कोट्स आणि संदेश घेऊन आलो आहोत. याशिवाय हे मेसेज व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर स्टेटस शेअर करू शकता. आम्ही तुम्हाला काही खास आणि अनोखे मेसेज, आणि कोट्स बद्दल सांगत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत या खास दिवशी शेअर करू (Happy Friendship Day 2024 Marathi Shubhechha Sandhesh Wishes, message, status, quotes) शकता.

पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश (Friendship Day Quotes In Marathi)

> मैत्रीतल्या प्रेमाला कधीच अंत नसतो,

मार्ग कोणताही असू दे तो जगाहून सुंदर असतो.

फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा!!

(Happy Friendship Day 2024 Wishes, WhatsApp Status, Wishes, Greetings, Facebook Messages, Quotes )

> पावसात जितका ओलावा नाही

तितका प्रेमाचा जिव्हाळा आपल्या नात्यात आहे,

ही नुसतीच मैत्री आहे की जगावेगळं प्रेम आहे,

फ्रेंडशिप डेच्या प्रेमळ शुभेच्छा!!

> मैत्री तुझी माझी

रोज आठवण न यावी असे होतच नाही,

रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही,

मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि

तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात!

Happy Friendships Day!!

> मैत्री हसवणारी असावी

मैत्री चिडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एक वेळेस ती भांडणारी असावी

पण कधीच बदलणारी नसावी!

Happy Friendship Day

> आठवणींच्या भोवऱ्यात एक क्षण आमचा असो,

बहरलेल्या फुलांमध्ये एक फुल आमचे असो,

जेव्हा तुम्ही मित्रांची आठवण काढाल,

तेव्हा त्या नावांच्या यादीत एक नाव आमचंही असो

हॅपी फ्रेंडशिप डे!

> मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय

जे कधी तिरस्कार करत नाही,

एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

(शुभेच्छा संदेश क्रेडिट: सोशल मीडिया)

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान

OBC त २९ नव्या जातींचा समावेश करण्याच्या हालचाली; राज्य मागासवर्ग आयोगाकडून प्रस्ताव; केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय

शेतकऱ्यांची योग्य वेळी कर्जमाफी करू! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन; आत्महत्या न करण्याचे आवाहन

स्वतंत्र राहायचे असल्यास विवाह करू नका! सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

असे असेल भारतीय अंतराळ स्थानक