लाईफस्टाईल

मुलांसाठी झटपट बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा नगेट्स; वाचा सोपी रेसिपी

काहीतरी झटपट, चविष्ट आणि तेही असं की मुलं तर काय मोठेही आनंदाने खातील असं बनवायचं असेल, तर पोह्यापासून तयार होणारे क्रिस्पी पोहा नगेट्स एकदम योग्य पर्याय आहे.

Krantee V. Kale

काहीतरी झटपट, चविष्ट आणि तेही असं की मुलं तर काय मोठेही आनंदाने खातील असं बनवायचं असेल, तर पोह्यापासून तयार होणारे क्रिस्पी पोहा नगेट्स एकदम योग्य पर्याय आहे. साध्या-सोप्या घरगुती साहित्यापासून बनणारी ही रेसिपी बनवायला अगदी झटपट, बाहेरून अतिशय कुरकुरीत , आतून मऊ आणि चवीला खास आहे. संध्याकाळी नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या डब्यात काही हेल्दी पदार्थ द्यायचा असेल तर पोहा नगेट्स परफेक्ट डिश आहे. जाणून घ्या पोहा नगेट्स रेसिपी!

साहित्य

  • पोहा (जाड पोहे) – १ कप

  • उकडलेले बटाटे – २ मध्यम

  • कांदा – १ बारीक चिरलेला

  • हिरवी मिरची – १ बारीक चिरलेली

  • आले-लसूण पेस्ट – १ छोटा चमचा

  • कोथिंबीर – २ चमचे बारीक चिरलेली

  • बेसन – २ चमचे

  • तांदळाचे पीठ – २ चमचे

  • मीठ – चवीनुसार

  • लाल तिखट – १/२ छोटा चमचा

  • हळद – १/४ छोटा चमचा

  • गरम मसाला – १/४ छोटा चमचा

  • तेल – तळण्यासाठी

कृती:

पोहा नगेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे दोन मिनिटे पाण्यात भिजवून लगेच चाळणीत काढा आणि त्यातले अतिरिक्त पाणी काढून घ्या. त्यानंतर पोहे हाताने हलके मॅश करून बाजूला ठेवा. आता मोठ्या भांड्यात मॅश केलेले बटाटे आणि पोहे एकत्र करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आले-लसूण पेस्ट घाला. यानंतर, मीठ, तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून संपूर्ण मिश्रण नीट मिक्स करा. मग त्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घालून चांगले एकजीव करुन, घट्ट मिश्रण तयार करा. हाताला थोडेसे तेल लावून या मिश्रणाच्या छोट्या-छोट्या नगेट्स किंवा टिक्क्या बनवा.

यानंतर कढईत तेल गरम करा. तेल तापल्यावर मंद आचेवर नगेट्स दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तळलेले नगेट्स किचन पेपरवर काढून ठेवा, ज्यामुळे जास्तीचे तेल निघून जाईल. गरमागरम कुरकुरीत पोहा नगेट्स सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत. तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करु शकता.

दिल्ली विमानतळावर प्रवाशाला पायलटकडून मारहाण; सोशल मीडियावर संताप, एअर इंडिया एक्सप्रेसची कारवाई

"आज तुमच्या हक्काचा दिवस..." ; नगरपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक : मतदानाच्या दिवशी अंबरनाथमध्ये गोंधळ; २०८ महिला भिवंडीतून आणल्याचा दावा, पोलिसांचा हस्तक्षेप

चीनमधील कॉन्सर्टमध्ये रोबोट्सचा भन्नाट डान्स; एलन मस्क यांची एका शब्दात प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल

आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक; ७ हत्तींचा मृत्यू, ट्रेनचे पाच डबे घसरले