लाईफस्टाईल

घरीच बनवा ६ महिने पुरेल कसूरी मेथी; खर्च फक्त १० रुपये अन् स्वयंपाकात चव- सुगंध दुपटीने

कसूरी मेथी ही आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्वाची मसाला आहे. ही भाज्यांना अप्रतिम चव, सुगंध आणि टेक्स्चर देते. जेव्हा तुम्ही एखाद्या भाजीत कसूरी मेथी हलकेसे चुरून टाकता, तेव्हा भाजीची चव खुलून येते.

Mayuri Gawade

कसूरी मेथी ही आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्वाची मसाला आहे. ही भाज्यांना अप्रतिम चव, सुगंध आणि टेक्स्चर देते. जेव्हा तुम्ही एखाद्या भाजीत कसूरी मेथी हलकेसे चुरून टाकता, तेव्हा भाजीची चव खुलून येते. बटाट्याचे पराठे, पनीर पराठे किंवा इतर भाज्यांमध्येही कसूरी मेथी अप्रतिम लागते.

पण बाजारातून विकत घेतली तर तिचा खर्च जास्त येतो. सध्या ताजी मेथी १०-१५ रुपयांमध्ये मिळते; उन्हाळ्यात हे भाव अजून वाढतात आणि ताजी मेथी मिळणे कठीण होते. मग का वाट पाहायचं? थोड्या सोप्या पद्धतीने घरच्याघरी कसूरी मेथी तयार करा, जे तुम्हाला ६ महिने पुरेल.

घरच्याघरी कसूरी मेथी बनवण्याची सोपी पद्धत

मेथी निवडा: बाजारातून एक जुडी ताजी मेथी घ्या.

स्वच्छ धुणे: मेथी पाण्याने २–३ वेळा नीट धुवा.

पाणी निथळवणे: धुतलेली मेथी पसरट चाळणीमध्ये ठेवा आणि पाणी पूर्णपणे निथळून घ्या.

वाळवणे: स्वच्छ सुती कपडा पसरवून त्यावर मेथी थोडक्यात टाका.

  • महत्त्वाचे: मेथी थेट उन्हात वाळवू नका; त्यामुळे रंग, चव आणि सुगंध कमी होतो.

२–३ दिवस थांबा: मेथी सुकल्यावर हाताने चुरून पाहा. जर ती कुरकुरीत वाटली, तर पुढे वापरण्यास तयार आहे.

साठवणे: एका कोरड्या काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

  • टीप: बाटली कोरडी असावी आणि मेथी काढताना ओले हात लागणार नाही याकडे लक्ष द्या.

फायदे

  • घरच्या मेथीचा रंग, सुगंध आणि चव बाजारातील मेथीपेक्षा खूप चांगला असतो.

  • खर्च वाचतो – फक्त १० रुपयांत ६ महिने पुरेल एवढी मेथी तयार करता येते.

  • भाजी, पराठे, करी किंवा इतर पदार्थात सहज वापरता येते.

एकदा ट्राय करून पाहा, तुमच्या स्वयंपाकात कसूरी मेथीची चव अजून खुलून येईल!

चेंबूर, दादरवरून थेट दक्षिण मुंबईत; सायन सर्कलजवळील पुलाला दोन अतिरिक्त मार्गिका, १३० कोटींचा प्रकल्प; डिसेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण होणार

मुंबईतील ४८ 'ब्लॅक स्पॉट' होणार सुरक्षित; अपघात रोखण्यासाठी दुभाजक, फलक लावणार

मुंबईतील ७ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; ५६४ लिटर दूध नष्ट

कराड : मुलाच्या खूनप्रकरणी घरातील तिघांना अटक

नवी मुंबईत पिण्याच्या पाण्यात कपात नाही; दररोजचा पाणी उपसा ४८० वरून ४०० एमएलडीपर्यंत आणणार