Instagram, Freepik
लाईफस्टाईल

Moong Dal Idli Recipe: मुलांसाठी नाश्त्यात बनवा मूग डाळ इडली, चवीसोबत मिळेल पोषण; जाणून घ्या रेसिपी

Breakfast Recipe: नेहमीच्या पद्धतीची इडली खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही मुलांसाठी ही वेगळ्या पद्धतीची इडलीची रेसिपी ट्राय करू शकता.

Tejashree Gaikwad

South Indian Food Recipe: इडली हा असा साऊथ इंडियन पदार्थ आहे जो लहान ते मोठे सगळ्यांनाच आवडते. इडली हा एक आरोग्यदायी पदार्थ आहे. पण नेहमीच्या स्टाईलने बनवलेली इडली खाऊन कंटाळा येतो. मग अशावेळी इडली तर खायची असते पण त्यात वेगळी कशी चव आणावी हे समजत नाही. तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी आहे मूग डाळ इडलीची. तुम्हाला नाश्त्यात तुमच्या मुलासाठी काही चवदार आणि आरोग्यदायी पदार्थ बनवाचा असेल तर मूग डाळ इडलीची रेसिपी तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते. मूग डाळ इडली खाल्ल्याने तुमच्या मुलांना दिवसभर उत्साही वाटेल. चला जाणून घेऊया मूग डाळ इडलीची रेसिपी.

जाणून घ्या कृती

> सर्वप्रथम तुम्हाला एक कप मूग डाळ सुमारे २ तास भिजत ठेवावी.

> २ तासानंतर डाळीतून पाणी गाळून घ्या आणि भिजवलेली मूग डाळ मिक्सरमध्ये फिरवून घ्या. लक्षात घ्या तुम्हाला बारीक-गुळगुळीत पेस्ट तयार करा.

> यानंतर तुम्हाला ही मूग डाळीची बारीक पेस्ट अर्धा कप दह्यासोबत फेटून घ्या.

> आता एका कढईत दोन चमचे तेल गरम करून त्यात अर्धा चमचा काळी मोहरी, एक चमचा जिरे, एक चमचा हरभरा डाळ, मधूनमधून कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या, आले आणि ६ बारीक चिरलेले काजू घाला. यानंतर कढईत चिरलेली गाजर घाला आणि सर्वकाही चांगले परतून घ्या.

> तयार फोडणी मूग डाळीच्या पेस्टमध्ये घालून त्यात हिंग व मीठ घालून ढवळून घ्या.

> पीठ फुगण्यासाठी त्यात तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा इनो देखील घालू शकता.

> रेगुलर पद्धतीप्रमाणे इडलीच्या साच्यात मिश्रण घाला आणि साधारण १५ मिनिटे मंद आचेवर वाफेवर शिजवा.

> मूग डाळीपासून बनवलेली ही चवदार इडली चटणीसोबत सर्व्ह करा.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत