www.viniscookbook.com
लाईफस्टाईल

Suji Dahi Chilla Recipe: रवा, दही आणि कांद्यापासून नाश्त्यासाठी बनवा टेस्टी चीला, जाणून घ्या रेसिपी

Breakfast Recipe: विशेष म्हणजे हा चीला तुम्हाला टेस्ट देईल आणि तुमचे वजन वाढणार नाही.

Tejashree Gaikwad

Testy and Healthy Recipe: आजकाल सगळेच आपल्याच आरोग्याबाबत सतर्क झाले आहेत. यामुळे वर्कआउटसोबत अनेकजण डाएटकडे लक्ष देत आहेत. स्वतः घरी अनेक स्वादिष्ट पदार्थ निरोगी पद्धतीने बनवू आणि खाऊ शकता. अशीच एक टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. नाश्ता असो किंवा स्नॅक्स, चीला हा अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. रव्यासोबत तुम्ही पटकन स्वादिष्ट चीला बनवू शकता. रवा, दही आणि कांदा घालून तुम्ही चविष्ट चीला बनवू शकता. विशेष म्हणजे हा चीला तुम्हाला टेस्ट देईल आणि तुमचे वजन वाढणार नाही. चला जाणून घेऊयात रवा आणि दही चीला कसा बनवायचा?

जाणून घ्या रेसिपी

  • एका भांड्यात १ कप रवा घ्या. रव्यात साधारण अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी एकत्र करून फेटून घ्या. हे दह्याचे मिश्रण रव्यात मिसळून फुगण्यासाठी बाजूला ठेवा. हे मिश्रण साधारण २० मिनिटे भिजवून ठेवावे.

  • पुढे तुमच्या आवडीची कोणतीही भाजी कापून मिश्रणात घाला. आवर्जून कांदा आणि टोमॅटो घाला. दोन्ही गोष्टी बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या.

  • आता त्या मिश्रणात हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक चिरून घाला. पुढे अर्धा चमचा आले लसूण पेस्ट घाला. अर्धा चमचा हळद, थोडी ठेचलेली लाल मिरची आणि अर्धा चमचा गरम मसाला एकत्र करा.

  • हे पीठ थोडे घट्ट असेल तर पाणी घालून पातळ करा. चवीनुसार मीठ घाला.

  • डोसा तवा किंवा साधा तवा घ्या आणि गरम झाल्यावर त्यावर तूप लावा. आता बनवलेले पिठ छान गोलाकार पसरून शिजू द्या. चीला एका बाजूने शिजला की तो उलटा आणि नंतर दुसऱ्या बाजूनेही शिजवा.

  • चीला दोन्ही बाजूंनी चांगला भाजून झाल्यावर प्लेटमध्ये काढून हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी