How to Make Tasty Pakodas: पावसाच्या हलक्या सरी आणि चहा-पकोडे, हे एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे. पावसाळ्यात पकोडे किंवा भजी खाण्याची खरी मजा येते. बटाटे आणि कांद्याव्यतिरिक्त डाळींपासूनही तुम्ही पकोडे बनवू शकता. पण तुम्ही कधी कच्च्या तांदूळ आणि बटाट्याचे पकोडे खाल्ले आहेत का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याची रेसिपी सांगणार आहे. हे पकोडे काही मिनिटांत तयार होतात आणि त्यांना बनवण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता नाही. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
कच्चा तांदूळ- १ वाटी
१ तुकडा आले
३ ते ४ हिरव्या मिरच्या
३ ते ४ लसूण पाकळ्या
२५० ग्रॅम उकडलेले बटाटे
चवीनुसार मीठ
१ चमचा जिरे
१ चमचा चाट मसाला
जाणून घ्या कृती
तांदूळ १ ते २ तास पाण्यात भिजत ठेवा.
यानंतर मिक्सरमध्ये आले, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि थोडे पाणी घालून बारीक करून घ्या. ही पेस्ट एका भांड्यात काढा.
आता मिक्सरमध्ये उकडलेल्या बटाट्यासोबत थोडे पाणी घालून तेही बारीक करून घ्या.
ही पेस्ट तांदळाच्या पेस्टमध्ये घालून मिक्स करा.
आता त्यात मीठ, जिरे, चाट मसाला, मूठभर ताजी चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा.
कढईत तेल तापायला ठेवा. तेल चांगले तापले की या पिठात चमच्याने किंवा हाताने पकोडे तयार करा.
हे पकोडे कोथिंबीर-पुदिना हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.
आल्याच्या चहासोबत पावसाळी वातावरणात हे पकोडे खायला मजा येते.