Viral Jokes In Marathi Freepik
लाईफस्टाईल

Joke of The Day: बायको – अहो, उठा, मला करंज्या तळायच्या आहेत...

Latest Marathi Joke: तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हसणे एक अतिशय प्रभावी उपाय आहे. याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास जोक घेऊन आलो आहोत.

Tejashree Gaikwad

Viral Jokes In Marathi: माणसाने नेहमी हसत राहिले पाहिजे असं म्हंटलं जातं. कारण हे एक स्वस्त औषध आहे. तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर हसणं फार गरजेचं आहे. आजकालचा काळ, लाइफस्टाईल ही फारच तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण लाईफस्टाईलमध्ये हसणे फार फायदेशीर ठरते. तुमचा ताण कमी करण्यासाठी तर हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. हे तणावाच्या अनेक रोग-उद्भवणाऱ्या परिणामांवर नैसर्गिक सोल्युशन म्हणून काम करते. हसण्याचे अगणित फायदे (funny jokes in Marathi for friends)आहेत.

आनंद घ्या 'या' जोक्सचा

> बायको – अहो, उठा,
मला करंज्या तळायच्या आहेत.
नवरा – मग, मी काय
कढईत झोपलो आहे का…?

> पुण्यात कॉलेजला जाताना रस्त्यावर
प्रियकर प्रेयसीला म्हणतो, – प्रिये, मला
तुझ्या डोळ्यात सगळ जग दिसतंय…
तेवढ्यात बाजूने जाणारा एकजण विचारतो, –
अरे मग तेवढं पुढच्या चौकात ट्राफिक आहे का
तेवढं बघून सांग रे…!

> आजकाल 8 वी 9 वीची पोर
सर्रास सिगरेट ओढतात
आणि
आम्ही एक होतो….
बोर पण सांभाळून खायचो,
पोटात झाड येईल या भीतीने…!!!

जोक स्त्रोत - सोशल मीडिया

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेलं विनोद हे मनोरंजनासाठी आहेत. यातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा 'नवशक्ति'चा हेतू नाही.)

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video