Instagram New Feature : स्टोरी पोस्ट करताना चूक झाली? टेन्शन नको! १५ मिनिटांत 'अशी' करा एडिट; जाणून घ्या सर्व प्रोसेस 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Instagram New Feature : स्टोरी पोस्ट करताना चूक झाली? टेन्शन नको! १५ मिनिटांत 'अशी' करा एडिट; जाणून घ्या सर्व प्रोसेस

इन्स्टाग्रामचा वापर केवळ फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठीच नाही, तर व्यवसाय, जाहिराती आणि प्रमोशनसाठीही मोठ्या प्रमाणावर केला जातो.

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केल्यानंतर त्यात एखादी चूक लक्षात आली, तर ती दुरुस्त करण्यासाठी आतापर्यंत स्टोरी डिलीट करून पुन्हा पोस्ट करावी लागत होती. कधी मजकुरात टायपो राहतो, तर कधी गाणं किंवा स्टिकर चुकीचा निवडला जातो. अशा वेळी स्टोरीला मिळालेले व्ह्यूज आणि लाइक्सही गमवावे लागू शकतात. मात्र, आता इन्स्टाग्रामने युजर्सची ही अडचण दूर करण्यासाठी नवं फीचर आणलं आहे. यामुळे स्टोरी पोस्ट केल्यानंतर पुढील १५ मिनिटांपर्यंत त्यात बदल करता येणार आहेत. विशेष म्हणजे, एडिट केल्यानंतरही स्टोरीवरील आधीचे लाइक्स, व्ह्यूज आणि रिप्लाय कायम राहणार आहेत.

स्टोरी एडिट करण्यासाठी काय करावं?

इन्स्टाग्रामचं हे फीचर वापरणं अगदी सोपं आहे. तुम्ही एखादी स्टोरी पोस्ट केली आणि त्यात काही बदल करायचा असेल, तर पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेली स्टोरी ओपन करा.

  • स्क्रीनच्या खालच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्स म्हणजेच 'More' या पर्यायावर टॅप करा.

  • त्यानंतर दिसणाऱ्या मेन्यूमधील 'Edit Story' या पर्यायावर क्लिक करा.

  • आता स्टोरीमधील मजकूर, म्युझिक, स्टिकर्स किंवा इतर डिझाइनमध्ये आवश्यक ते बदल करा.

  • बदल पूर्ण झाल्यानंतर स्टोरी अपडेट करा.

मात्र, स्टोरी पोस्ट केल्यानंतर केवळ १५ मिनिटांच्या आतच हे बदल करता येणार आहेत. त्यामुळे ही वेळ लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.

एडिट केल्यानंतरही लाइक्स आणि व्ह्यूज राहणार कायम

या फीचरचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्टोरी एडिट केल्यानंतरही तिच्याशी संबंधित आधीची माहिती कायम राहणार आहे. म्हणजेच, स्टोरीला मिळालेले लाइक्स, व्ह्यूज, रिप्लाय आणि कमेंट्स डिलीट होणार नाहीत. त्यामुळे एखादी चूक सुधारण्यासाठी स्टोरी पुन्हा पोस्ट करण्याची गरज भासणार नाही.

स्टोरी एडिट केल्याचं इतरांना समजणार

स्टोरीमध्ये बदल केल्यानंतर इन्स्टाग्राम त्यावर 'Edited' असं लेबल दाखवणार आहे. म्हणजेच, स्टोरी एडिट केली आहे, हे पाहणाऱ्या युजर्सनाही समजू शकणार आहे. इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांनीही या नव्या अपडेटची माहिती शेअर केली आहे. अनेक युजर्सकडून या फीचरची मागणी केली जात होती, असं त्यांनी सांगितलं.

क्रिएटर्स आणि व्यवसायांसाठीही फायदेशीर

इन्स्टाग्रामचा वापर केवळ फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यासाठीच नाही, तर व्यवसाय, जाहिराती आणि प्रमोशनसाठीही मोठ्या प्रमाणावर केला जातो. अशा वेळी स्टोरीमधील हॅशटॅग, मजकूर किंवा प्रमोशनल माहितीमध्ये चूक झाल्यास ती लगेच सुधारता येणार आहे. त्यामुळे क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि व्यावसायिकांना या फीचरचा विशेष फायदा होऊ शकतो.

एकूणच, स्टोरी पोस्ट केल्यानंतर झालेली छोटीशी चूक सुधारण्यासाठी ती डिलीट करून पुन्हा पोस्ट करण्याची कटकट आता कमी होणार आहे. मात्र, एडिट करण्यासाठी मिळणारा १५ मिनिटांचा अवधी संपण्यापूर्वी बदल करणं आवश्यक आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Local Update : उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर ब्लॉक

प्रत्येक बालकाला २२ नोव्हेंबरला पोलिओचे डोस; मुंबईत रविवारी पल्स पोलिओ मोहीम; २३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान लसीकरण

Pune : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात महिलांचा राडा; शिवसेना ठाकरे गटाच्या रेखा कोंडे यांना मारहाण, चौघींवर गुन्हा दाखल

Mumbai : तरुणीची छेड काढली, विरोध करताच दोघांना बेदम मारहाण; कुर्ल्यातील व्हायरल VIDEO प्रकरणी ८ अल्पवयीन ताब्यात

संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिला प्रवाशाला पोलिसाकडून बेदम मारहाण; Video व्हायरल