कांदा पापड चटणी; झटपट तयार होणारी चविष्ट रेसिपी, जेवणाला देईल भन्नाट ट्विस्ट (Photo-@sanjeevkapoor)
लाईफस्टाईल

कांदा पापड चटणी; झटपट तयार होणारी चविष्ट रेसिपी, जेवणाला देईल भन्नाट टेस्ट

कमी वेळात तयार होणारी कांदा पापड चटणीची रेसिपी जाणून घ्या. कुरकुरीत पापड, शेंगदाणे आणि कांद्याची ही चटणी जेवणाची चव वाढवेल.

किशोरी घायवट-उबाळे

घरच्या जेवणात रोज तीच भाजी-चपाती खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी झटपट आणि चविष्ट साईड डिश बनवण्याचा विचार नक्कीच मनात येतो. अशावेळी 'कांदा पापड चटणी' हा परफेक्ट पर्याय ठरतो. कमी वेळात, घरच्या उपलब्ध साहित्यांपासून तयार होणारी ही चटणी जेवणाची चव अनेक पटींनी वाढवते. कांदा, शेंगदाणे आणि कुरकुरीत पापड यांचा एकत्रित स्वाद म्हणजे अगदी लज्जतदार अनुभव!

साहित्य :

  • मध्यम आकाराचे कांदे (जाडसर कापलेले) - २

  • भाजलेले उडीद डाळ पापड - ६

  • लसूण पाकळ्या - १० ते १२

  • हिरव्या मिरच्या - ४

  • भाजलेले शेंगदाणे - अर्धा कप

  • तेल - ३ टेबलस्पून

  • जिरे - १ टीस्पून

  • टोमॅटो (चिरलेला) - १ छोटा

  • मीठ - चवीनुसार

  • कोथिंबीर (चिरलेली) - २ ते ३ टेबलस्पून

कृती :

सर्वप्रथम खलबत्त्यात लसूण, हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे टाकून जाडसर कुटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यात कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परता. आता तयार केलेले कुटलेले मिश्रण घालून २ ते ३ मिनिटे परता. त्यानंतर टोमॅटो आणि मीठ घालून १ ते २ मिनिटे शिजवा. शेवटी पापड हाताने कुस्करून घाला, कोथिंबीर टाका आणि २ ते ३ मिनिटे परतून गॅस बंद करा. गरमागरम चटणी सर्व्ह करा.

टिप्स :

  • पापड शेवटी घातल्यास त्याचा कुरकुरीत टेक्स्चर टिकून राहतो.

  • जास्त तिखट हवे असल्यास मिरच्यांचे प्रमाण वाढवा.

  • लसूण आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकता.

  • ही चटणी भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत अप्रतिम लागते.

  • थोडंसं लिंबू किंवा कैरी घातल्यास चटणीला छान चव येते.

BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचे भारतात आगमन; ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

लोकल चलन, ग्लोबल व्यापार! स्थानि‍क चलनात व्यापार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी; भांडुप ते तुर्भे साडेतीन तास

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी

राज्यात १०० टक्के दुष्काळाचे सावट; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची चिंता