'एआय' ने बनवलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

दूध लवकर खराब होतंय? उन्हाळ्यात 'या' टिप्स ठरतील उपयोगी; जास्त वेळ राहील ताजं

उन्हाळ्यात दूध पटकन खराब होते का? जाणून घ्या दूध जास्त वेळ ताजं ठेवण्यासाठी सोप्या आणि प्रभावी घरगुती टिप्स.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळ्याच्या दिवसांत दूध पटकन खराब होण्याची समस्या अनेकांच्या घरात जाणवते. उष्ण तापमानामुळे दूध लवकर आंबते आणि वाया जाण्याची शक्यता वाढते. मात्र, काही सोप्या सवयी लावल्या तर दूध अधिक काळ ताजं ठेवणं शक्य आहे.

घरगुती वापरात छोटे बदल करून तुम्ही दूध खराब होण्यापासून सहज वाचवू शकता.

दूध उकळल्यानंतर लगेच थंड करा

दूध उकळल्यानंतर ते गरम अवस्थेतच ठेवू नका. ते लगेच थंड करून घ्या. गरम दूध जास्त वेळ ठेवले तर त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते.

उकळताना चिमूटभर सोडा

दूध उकळताना त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घातल्यास दूध लवकर आंबत नाही. मात्र, याचे प्रमाण खूप कमी ठेवणे गरजेचे आहे.

फ्रिजमध्ये योग्य पद्धतीने ठेवा

दूध नेहमी फ्रिजमध्ये ठेवा. विशेषतः फ्रिजच्या मागील भागात ठेवले तर ते अधिक थंड राहते आणि जास्त वेळ टिकते.

स्वच्छ भांडे वापरा

दूध साठवण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरडे भांडे वापरा. ओलसर किंवा अस्वच्छ भांड्यामुळे दूध लवकर खराब होऊ शकते.

रात्रीचे दूध वेगळे साठवा

रात्री उकळलेले दूध आणि सकाळचे दूध एकत्र मिसळू नका. यामुळे दूध पटकन आंबण्याची शक्यता वाढते.

लहान सवयी, मोठा फायदा

उन्हाळ्यात दूध टिकवण्यासाठी या साध्या टिप्स खूप उपयोगी ठरू शकतात. योग्य काळजी घेतल्यास दूध जास्त वेळ ताजं राहील आणि अन्न वाया जाण्यापासूनही बचाव होईल.

सावकारी फायनान्स कंपन्यांचा धुडगूस..!

आजचे राशिभविष्य, २३ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Winter Tips : थंडीचा आनंद घ्या बिनधास्त! सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

शेकोटीसाठी कचरा जाळल्यास पाच हजारांचा दंड! प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेचा दणका

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल