मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट; ट्राय करा मिक्स फ्रूट लस्सी 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी परफेक्ट; ट्राय करा मिक्स फ्रूट लस्सी

आंबा, अननस आणि केळे यांसारख्या फळांमुळे या लस्सीला नैसर्गिक गोडवा आणि फ्रेश फ्लेवर मिळतो.

किशोरी घायवट-उबाळे

दुपारच्या उन्हात शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने वाटणारे पेय पिण्याची इच्छा अनेकांना होते. अशावेळी मिक्स फ्रूट लस्सी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. दही, ताजी फळे आणि मध यांचा वापर करून तयार होणारी ही लस्सी चविष्ट तर लागतेच, शिवाय शरीरालाही ऊर्जा देते. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडू शकते.

मिक्स फ्रूट लस्सी खास का ठरते?

आंबा, अननस आणि केळे यांसारख्या फळांमुळे या लस्सीला नैसर्गिक गोडवा आणि फ्रेश फ्लेवर मिळतो. दह्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते, तर मधामुळे चव आणखी वाढते. उन्हात दुपारच्या वेळी किंवा स्नॅक्ससोबत हे हेल्दी ड्रिंक उत्तम पर्याय ठरू शकते.

साहित्य :

  • १ कप दही

  • १ कप मिक्स फळे (आंबा, अननस, केळे)

  • १ टेबलस्पून मध

  • चिमूटभर दालचिनी पावडर

  • पुदिन्याची पाने

  • बर्फाचे तुकडे

कृती :

आंबा, अननस आणि केळे लहान तुकड्यांमध्ये कापून घ्या. मिक्सरच्या भांड्यात दही, कापलेली फळे, मध आणि दालचिनी पावडर घाला. हे सर्व मिश्रण मिडीयम स्पीडवर ब्लेंड करून स्मूद आणि क्रीमी मिक्श्चर तयार करा. तयार लस्सी ग्लासमध्ये ओता. त्यात बर्फाचे तुकडे घालून वरून पुदिन्याच्या पानांनी सजवा.

टिप्स :

  • ताजी फळे वापरा - लस्सी अधिक चविष्ट लागण्यासाठी ताजी आणि गोड फळे वापरणे उत्तम ठरते.

  • साखरेऐवजी मध वापरा - हेल्दी पर्यायासाठी साखरेऐवजी मधाचा वापर करू शकता.

  • थंडगार सर्व्ह करा - लस्सी सर्व्ह करण्यापूर्वी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास चव अधिक छान लागते.

  • ड्रायफ्रूट्स घालू शकता - अधिक रिच स्वादासाठी बदाम, काजू किंवा पिस्त्याचे तुकडे घालू शकता.

रे क्षणांच्या संगतीने मी असा भारावलो...

जून महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

आजचे राशिभविष्य, २ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Environment Day 2026 : फक्त पर्यावरणच नाही! झाडं लावल्याने आरोग्यालाही होतो फायदा

हिमोग्लोबिन कमी आहे? रोज या ८ पदार्थांचा आहारात करा समावेश; रक्त वाढण्यास होईल मदत