५ मिनिटांत तयार होणारा 'मोईतो'; उन्हाळ्यासाठी परफेक्ट रिफ्रेशिंग ड्रिंक 
लाईफस्टाईल

५ मिनिटांत तयार होणारा 'मोईतो'; उन्हाळ्यासाठी परफेक्ट रिफ्रेशिंग ड्रिंक

उन्हाळ्यात ५ मिनिटांत तयार होणारा ‘मोईतो’ हा थंडगार आणि रिफ्रेशिंग ड्रिंक घरच्या घरी सहज बनवता येतो. पुदिना, लिंबू आणि सोड्याच्या मिश्रणामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि थकवा कमी होण्यास मदत होते.

Mayuri Gawade

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे शरीर थकून जातं आणि लगेच काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा होते. अशावेळी बाहेरचे कोल्ड ड्रिंक्स घेण्यापेक्षा घरच्या घरी झटपट तयार होणारा ‘मोईतो’ (Mojito) हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. केवळ ५ मिनिटांत तयार होणारं हे ड्रिंक शरीराला थंडावा देतं आणि थकवा दूर करण्यास मदत करतं.

मोईतो का आहे खास?

मोईतोमध्ये पुदिन्याची ताजगी, लिंबाचा आंबटपणा आणि हलकी गोड चव एकत्र येते. हे मिश्रण शरीराला लगेच फ्रेश वाटायला मदत करतं. उन्हातून आल्यावर हे पेय घेतल्यास शरीर हायड्रेट राहतं आणि उष्णतेचा त्रास कमी होतो.

साहित्य

१ लिंबू
८–१० पुदिन्याची पाने
२ चमचे साखर (किंवा चवीनुसार)
१ ग्लास थंड सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर
बर्फाचे तुकडे
चिमूटभर मीठ

कृती

लिंबाचे छोटे तुकडे करून ग्लासमध्ये घाला. त्यात साखर आणि पुदिन्याची पाने घालून हलक्या हाताने कुस्करून घ्या, जेणेकरून लिंबाचा रस आणि पुदिन्याचा सुगंध बाहेर येईल.

यानंतर बर्फाचे तुकडे घालून त्यावर थंड सोडा किंवा स्पार्कलिंग वॉटर ओता. चवीनुसार चिमूटभर मीठ घालून हलक्या हाताने ढवळा.

वरून पुदिन्याची पाने किंवा लिंबाचे काप लावून सजवा. ५ मिनिटांत तुमचा थंडगार ‘मोईतो’ तयार आहे.

काही सोप्या टिप्स

साखरेऐवजी मध वापरल्यास चव अधिक नैसर्गिक लागते. स्ट्रॉबेरी, कलिंगड किंवा संत्रा घालून वेगवेगळे फ्लेवर्सही तयार करता येतात. मात्र पुदिन्याची पाने जास्त कुस्करू नयेत, नाहीतर चव कडू होऊ शकते.

उन्हाळ्यात पटकन तयार होणारं, चवीला ताजेतवाने आणि शरीराला थंडावा देणारं हे ‘मोईतो’ नक्की करून पाहा.

Mumbai Traffic Update : भांडुप-सोनापूर जंक्शनवरून रात्री प्रवास करताय? आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग

FASTag New Rules : टोलनाक्यापासून २० किमी अंतरामध्ये राहता? १ नोव्हेंबरपासून १,५०० रुपयांत वर्षभराचा पास; जाणून घ्या नियम

Mumbai : जे. जे. उड्डाणपुलाखाली डबलडेकर बस धूळखात! कलादालन, कॅफेटेरिया, वाचनालय कागदावरच; महिला बचत गटांची पाठ

मुंबई, ठाणे, भिवंडीकरांनो पुढील ७ दिवस पाणी उकळून प्या; BMC चे आवाहन

Mumbai : अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर बडगा! ११ नोव्हेंबरपर्यंत BMC ची विशेष मोहीम