लाईफस्टाईल

Monsoon Care: मान्सून आणि किडनीच्या आजारांचा आहे संबंध, जाणून घ्या कशी काळजी घ्यायची

Kidney Diseases: मान्सूनच्या काळात किडनीच्या समस्यांमध्ये अचानक वाढ झालेली दिसून येते.

Tejashree Gaikwad

Health Care Tips: सर्व ऋतूंमध्ये ज्याची सर्वाधिक असोशीने वाट पाहिली जाते असा ऋतू म्हणजे पावसाळा. मात्र योग्य काळजी आणि खबरदारी घेतली गेली नाही तर या दिवसांत अनेक आरोग्यसमस्या निर्माण होऊ शकतात, ज्यातील काही समस्यांचा व्यक्तीच्या दीर्घकालीन आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. मान्सूनच्या काळात किडनीच्या समस्यांमध्ये अचानक वाढ झालेली दिसून येते. यातील काही सर्वसामान्य समस्यांबद्दल फोर्टिस नेटवर्क हॉस्पिटल असलेल्या वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजी विभागाचे डिरेक्टर आणि कन्सस्टन्ट-ट्रान्सप्लान्ट फिजिशियन डॉ. अतुल इंगळे यांच्याकडून जाणून घेऊयात.

अक्युट किडनी इन्ज्युरी (AKI)

किडनीचे कार्य अचानकपणे मंदावणे; जंतूसंसर्ग, डीहायड्रेशन अर्थात शरीरातील आर्द्रतेची पातळी खाली जाणे आणि विषबाधा यांसारख्या अनेक कारणांमुळे अक्युट किडनी इन्ज्युरी ही समस्या निर्माण होऊ शकते. ही स्थिती मान्सूनच्या काळात सर्वत्र अधिक प्रमाणात आढळून येते, कारण या दिवसांत लोकांचा दूषित पाणी व अन्नाशी संपर्क येतो. अक्युट किडनी इन्ज्युरी च्या लक्षणांमध्ये थकवा जाणवणे, अतिसार वा डायरिया, डीहायड्रेशन आणि झोपाळल्यासारखे वाटणे या तक्रारींचा समवेश होतो.

लेप्टोस्पायरोसिस

बॅक्टेरिया संसर्गाचा एक प्रकार असलेला लेप्टोस्पायरोसिस हा आजार सर्वसाधारणपणे दूषित पाणी किंवा मातीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. त्वचा, डोळे, नाक किंवा तोंडावर कापल्यामुळे झालेल्या भेगा किंवा ओरखड्यांच्या माध्यमातून हे बॅक्टेरिया शरीरामध्ये शिरू शकतात. लेप्टोस्पायरोसिसच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि उलट्या यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे किडनी निकामी होऊ शकते.

डेंग्यू

डासांद्वारे फैलावणाऱ्या डेंग्यू या विषाणूजन्य आजारारमुळे ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी किंवा अंगावर चट्टे उठणे अशी लक्षणे दिसू शकतात. डेंग्यूच्या बहुतांश रुग्णांवर औषधांच्या सहाय्याने घरच्याघरीच उपचार करता येतो, काही प्रकरणांमध्ये मात्र डेंग्यूमुळे तीव्र स्वरूपाच्या गुंतागुंती उद्भवू शकतात. जसे की डेंग्यू हेमरहेजिक तापामुळे किडनी खराब होऊ शकते.

टायफॉइड

दूषित अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून पसरणारा हा एक बॅक्टेरियल संसर्ग आहे. टायफॉइड बॅक्टेरिया रक्तप्रवाहातून पसरतो, ज्यामुळे तो प्रचंड धोकादायक आणि प्राणघातक ठरू शकतो. बॅक्टेरियम साल्मोनेला टायफी या बॅक्टेरियामुळे टायफॉइड होतो, ज्याच्या अनेक लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी आणि थकवा यांचा समावेश होतो. काही प्रकरणांमध्ये टायफॉइडमुळे किडनी निकामी होऊ शकते.

पावसाळी आजार झालेल्या व्यक्तींपैकी प्रत्येकालाच किडनीच्या समस्या जाणवत नाहीत ही महत्त्वाची गोष्ट इथे नोंदवायला हवी. मात्र आधीपासूनच किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींची रोगप्रतिकार यंत्रणा ही नाजूक बनलेली असते, ज्यामुळे अशा व्यक्तींना वरील पावसाळी आजारांची लागण झाली तर त्यांच्याबाबतीत किडनीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता तुलनेने अधिक असते.

CKD शी संबंधित काही पावसाळी आजार कोणते?

ज्या स्थितीमध्ये किडन्यांची रक्तामधून अशुद्ध तत्त्वे फिल्टर करण्याची क्षमता नष्ट होते अशा स्थितीला क्रॉनिक किडनी डिजिज किंवा CKD असे म्हणतात आणि या समस्येमुळे व्यक्तीला हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका संभवू शकतो. या स्थितीमध्ये रक्तातील विषद्रव्ये इतर अवयवांना आणि उतींना हानी पोहोचवू शकतात.

CKD असलेल्या व्यक्तींवर अनेक पावसाळी आजार परिणाम करू शकतात. यात पुढील आजारांचा समावेश होतो:

> डायरिया: डायरियामुळे डीहायड्रेशन होते, जे CKD असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते. या स्थितीमुळे व्यक्तीच्या शरीरामध्ये पोषक घटक शोषले जाणे अवघड बनते, ज्यामुळे किडनीला अधिकच हानी पोहोचते.

> मलेरिया: मलेरिया हा एक डासांद्वारे फैलावणारा आजार आहे, जो CKD असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो. यामध्ये ताप, हुडहुडी भरणे आणि इतर लक्षणे आढळून येतात. या आजारामुळेही, विशेषत: CKD असलेल्या लोकांच्या किडन्यांना हानी पोहोचू शकते.

> टायफॉइडचा ताप: बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होणाऱ्या टायफॉइड आजाराच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, मळमळणे, अशक्तपणा आणि पोटात दुखणे यांचा त्रास होतो, विशेषत: CKD ग्रस्त लोकांना याचा त्रास होतो.

> हेपटायटिस ए: हेपटायटिस ए या विषाणू संसर्गामुळे यकृत अर्थात लिव्हर खराब होऊ शकते. हा आजार विशेषत: CKD असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो, कारण त्यांच्या किडन्या खराब झालेल्या यकृताने उत्सर्जित केलेल्या विषद्रव्यांना फिल्टर करण्यास असमर्थ ठरू शकतात.

> हेपटायटिस बी: हेटायटिस बी या विषाणू संसर्गामुळेही लिव्हर खराब होऊ शकते. हेपटायटिस ए प्रमाणेच हा आजारही CKD असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतो.

पावसाळ्यामध्ये किडनीला हानी पोहोचण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी काही सूचना

तुम्हाला कोणत्याही पावसाळी आजाराची लक्षणे जाणवत असतील तर तत्काळ डॉक्टरांची भेट घेणे अत्यावश्यक आहे. लक्षात ठेवा लवकरात लवकर केलेले निदान आणि उपचार यामुळे किडनी निकामी होण्यासह इतर गंभीर गुंतागूंतींना प्रतिबंध होण्यास मदत होते. या ऋतूमध्ये किडनीचे संरक्षण करण्यास मदत करणाऱ्या काही इतर उपाययोजना पुढीलप्रमाणे:

> भरपूर द्रवपदार्थ घेतल्याने डीहायड्रेशनला प्रतिबंध करण्यास खूप मदत होऊ शकते.

> साचलेल्या पाण्यात पोहणे किंवा असे पाणी पिणे टाळणे

> आपले हात साबण व पाण्याने वरचेवर धुणे

> किटकांना दूर ठेवणारी इन्सेक्ट रिपेलंट वापरल्याने मलेरिला आणि इतर आजार संक्रमित करणारे डासांच्या चाव्यापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

> अन्न व्यवस्थित शिजवणे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण ही अन्नात असू कोणत्याही घातक बॅक्टेरियाला मारण्याची एक परिणामकारक पद्धत आहे.

> आजारी व्यक्तींचा संपर्क टाळणे

> तुम्ही औषध घेत असाल तर डॉक्टरांच्या सूचनांनुसार ती घेण्याची काळजी घ्यायला हवी.

> लसीकरणामुळे या आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल.

तुम्हाला AKD किंवा CKD यातील कोणत्याही प्रकारचा किडनी आजार असल्यास वरील लक्षणांवर लक्ष ठेवा आणि त्यातील कोणतीही लक्षणे जाणवू लागल्यास विशेषज्ज्ञांची मदत घ्या. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्यातून लगेचच गंभीर संसर्ग होऊ शकतो तसेच या आजारांवर लवकरात लवकर उपचार करणे हे किडनीची अधिक हानी टाळण्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी