लाईफस्टाईल

क्लिअर स्किन हवीये? मग ‘हा’ नैसर्गिक ज्यूस एकदा ट्राय करून बघाच

चमकदार आणि क्लिअर त्वचा मिळवण्यासाठी आपण किती काय-काय करतो. महागडी स्किनट्रीटमेंट्स, वेगवेगळे क्रीम्स आणि फेसवॉश. पण, त्वचेवर खरं प्रतिबिंब उमटतं तुमच्या आहाराचं. आहारतज्ज्ञ स्नेहल सांगतात...

Mayuri Gawade

चमकदार आणि क्लिअर त्वचा मिळवण्यासाठी आपण किती काय-काय करतो. महागडी स्किनट्रीटमेंट्स, वेगवेगळे क्रीम्स आणि फेसवॉश… पण त्वचेवर खरं प्रतिबिंब उमटतं तुमच्या आहाराचं. तुम्ही काय खाता, किती पाणी पिता, हे सगळं तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम करतं. आहारतज्ज्ञ स्नेहल या गोष्टीवर नेहमी भर देतात. त्यांच्या @snehyoga_official या इंस्टाग्राम पेजवर त्या सातत्याने आरोग्य, आहार आणि नैसर्गिक उपायांविषयी माहिती शेअर करतात.

त्यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी त्वचा नैसर्गिकरित्या क्लिअर ठेवण्यासाठी एक सोप्पा आणि प्रभावी ज्यूस सुचवला आहे. त्या सांगतात, “क्लिअर स्किन हवी असेल तर हा ज्यूस नक्की ट्राय करा. त्यामध्ये संत्रं, गाजर, काळी मिरी आणि आल्याचा छोटा तुकडा हे सगळं एकत्र ब्लेंड करा. त्यात गरजेनुसार पाणीही घालू शकता.”

याचे परिणाम काय?

त्यांच्या म्हणण्यानुसार, या ज्यूसमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन C, अँटीऑक्सिडंट्स असतात जे स्किन हेल्दी ठेवण्यास मदत करतात. शिवाय, हा ज्यूस इंफ्लेमेशन म्हणजे जळजळ कमी करतो. सोबतच लिव्हर डिटॉक्स करतो. त्यामुळे त्वचा आपोआप उजळते आणि मृदू होते.

प्रत्येक वेळेस केवळ स्किन प्रॉडक्ट्सवर विसंबून न राहता, आपल्या रोजच्या आहारात असे नैसर्गिक पर्याय निवडले, तर त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर होऊ शकते.

(Disclaimer: ही माहिती स्नेहल यांच्या इंस्टाग्रामवरील व्हिडिओवर आधारित आहे. यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा