लाईफस्टाईल

Navratri 2025 : यंदाचे रंग कोणते? लवकरच सुरू होतोय शारदीय नवरात्रोत्सव; जाणून घ्या सविस्तर

पितृपक्ष संपताच शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात होणार आहे. यासाठी विविध ठिकाणी तयारीला सुरूवातही झाली आहे. अशातच मुख्य आकर्षण असतं ते या नऊ दिवसांतल्या नऊ रंगांचं. तर चला, यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे ते पाहूया...

Mayuri Gawade

गणेशोत्सवानंतर आता भाविकांना वेध लागलेत ते म्हणजे देवीच्या आगमनाचे. पितृपक्ष संपताच शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात होणार आहे. यासाठी विविध ठिकाणी तयारीला सुरूवातही झाली आहे. आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदेला देवीचे आगमन होते आणि तेथून सुरू होतो नऊ दिवसांचा भक्तिभावाने उजळून निघणारा उत्सव. घटस्थापनेपासून ते नवमीपर्यंत देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते, तर विजयादशमीच्या दिवशी घट किंवा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करून सणाचा समारोप होतो.

यंदा शारदीय नवरात्र २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरदरम्यान साजरी होणार आहे. नवरात्र म्हटलं की देवीची आराधना, गरबा-दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबरच नऊ दिवस नऊ रंगांची परंपरा हे उत्सवाचे मुख्य आकर्षण असते. रेल्वे स्टेशन, ऑफिस, शाळा, कॉलेजपासून ते गरबा मंडळांपर्यंत सर्वत्र या रंगांची उधळण पाहायला मिळते. एकाच रंगात सजून आलेल्या तरुणी, महिलांची गर्दी दिसते. तर चला, यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा आहे ते पाहूया...

कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा?

प्रतिपदा - २२ सप्टेंबर २०२५ (सोमवार) : पांढरा रंग

द्वितीया - २३ सप्टेंबर २०२५ (मंगळवार) : लाल रंग

तृतीया - २४ सप्टेंबर २०२५ (बुधवार) : निळा रंग

चतुर्थी - २५ सप्टेंबर २०२५ (गुरुवार) : पिवळा रंग

पंचमी - २६ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार) : हिरवा रंग

षष्टी - २७ सप्टेंबर २०२५ (शनिवार) : राखाडी रंग

सप्तमी - २८ सप्टेंबर २०२५ (रविवार) : केशरी रंग

अष्टमी - २९ सप्टेंबर २०२५ (सोमवार) : मोरपंखी रंग

नवमी - ३० सप्टेंबर २०२५ (मंगळवार) : गुलाबी रंग

नवरात्रीत नऊ रंगांचे कपडे का घालायचे?

नवरात्रीत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. असं म्हणतात की, देवीच्या प्रत्येक रूपाशी एक खास रंग जोडलेला असतो. त्यामुळे त्या दिवशी तो रंग परिधान केला जातो. या परंपरेतून देवीच्या स्वरूपांचा आदर व्यक्त केला जातो आणि उत्सवात आनंद, उत्साह आणि रंगत वाढते. खरंतर नवरात्रीत नऊ रंगाचे कपडे घालतलेच पाहिजेत असे कोणतेही शास्त्र नाहीये. हे संपूर्णतः ज्याच्या त्याच्या आवडीवर अवलंबून आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती