रोजच्या भाज्यांचा कंटाळा आलाय? जेवणासोबत द्या ही कांद्याची चटणी; सगळेच आवडीने जेवतील 
लाईफस्टाईल

रोजच्या भाज्यांचा कंटाळा आलाय? जेवणासोबत द्या ही कांद्याची चटणी; सगळेच आवडीने जेवतील

रोजच्या भाज्यांना कंटाळा आला असेल, तर जेवणासोबत कच्च्या कांद्याची चटणी नक्की ट्राय करा. झटपट तयार होणारी ही चटणी जेवणाची चव वाढवते आणि सगळ्यांनाच आवडीने जेवायला लावते.

Mayuri Gawade

दररोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येणं स्वाभाविक आहे. विशेषतः लहान मुलं अनेकदा भाज्यांकडे पाठ फिरवतात. अशावेळी जेवणात थोडा बदल आणि चव वाढवण्यासाठी काहीतरी वेगळं हवं असतं. अगदी कमी वेळात तयार होणारी कच्च्या कांद्याची चटणी हा यासाठी परफेक्ट पर्याय ठरू शकतो.

कांदा हा जवळपास प्रत्येक स्वयंपाकात वापरला जाणारा महत्त्वाचा घटक आहे. त्याच कांद्यापासून बनणारी ही साधी चटणी चपाती, भाकरी किंवा गरम भातासोबत अतिशय चविष्ट लागते. नेहमीच्या खोबऱ्याच्या, लसूण किंवा शेंगदाण्याच्या चटणीपेक्षा ही चटणी वेगळ्या चवीमुळे नक्कीच आवडेल.

साहित्य

कच्चा कांदा
लसूण पाकळ्या
हिरव्या मिरच्या
लाल तिखट
मीठ
कोथिंबीर
तेल

कृती

सर्वप्रथम कांदा आणि लसूण सोलून बारीक चिरून घ्या. कांदा जितका बारीक चिराल, तितकी चटणी अधिक चविष्ट लागते.

यानंतर खलबत्यात चिरलेला कांदा, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घालून बारीक कुटून घ्या. खलबत्यात कुटल्याने चटणीची चव अधिक उठून येते.

आता त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि २–३ चमचे तेल घालून पुन्हा एकदा सगळं मिश्रण नीट कुटून घ्या.

झटपट तयार झालेली ही कच्च्या कांद्याची चटणी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

टिप्स

  • खलबत्यात कुटल्यास चटणीची चव अधिक छान लागते

  • कांदा बारीक चिरल्यास टेक्स्चर मऊ आणि चव अधिक चांगली लागते

  • आवडीनुसार लिंबाचा रस घालून चव अधिक टवटवीत करू शकता

  • तिखटपणा कमी-जास्त करण्यासाठी मिरच्यांचे प्रमाण बदलू शकता

रोजच्या जेवणात थोडा बदल हवा असेल, तर ही झटपट बनणारी कच्च्या कांद्याची चटणी नक्की करून पाहा.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके