वजन कमी करताय? 'हा' हेल्दी पालक-पनीर राइस तुमच्या डाएटसाठी परफेक्ट! 
लाईफस्टाईल

वजन कमी करताय? 'हा' हेल्दी पालक-पनीर राइस तुमच्या डाएटसाठी परफेक्ट!

वजन कमी करण्याच्या प्लॅनवर आहात आणि रोज-रोज सॅलड, सूप खाऊन कंटाळा आलाय? मग तुमच्यासाठी हा पालक-पनीर राइस म्हणजे एकदम परफेक्ट पर्याय! कमी कॅलरीज, जास्त पोषण आणि चव मात्र रेस्टॉरंट-स्टाईल, असा हा राइस १० मिनिटांत...

Mayuri Gawade

वजन कमी करण्याच्या प्लॅनवर आहात आणि रोज-रोज सॅलड, सूप खाऊन कंटाळा आलाय? मग तुमच्यासाठी हा पालक-पनीर राइस म्हणजे एकदम परफेक्ट पर्याय! कमी कॅलरीज, जास्त पोषण आणि चव मात्र रेस्टॉरंट-स्टाईल, असा हा राइस १० मिनिटांत तयार होतो आणि तुमचं डाएटही बिघडत नाही. पालकातील आयर्न, फोलेट, मॅग्नेशियम आणि पनीरमधील प्रोटीन यामुळे हा भात तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला हेल्दी सपोर्ट देतो. पटकन बनणारी, चवदार आणि पूर्ण पौष्टिक अशी ही झटपट रेसिपी तुम्हाला दिवसभर एनर्जेटिकही ठेवते!

चला मग, पटकन याची सोपी आणि झटपट रेसिपी जाणून घेऊ...

साहित्य :

  • पालक - अर्धी जुडी / २०-२५ पाने

  • मिरची - २

  • आलं - १ इंच

  • लसूण - ७-८ पाकळ्या

  • धणे-जीरे पावडर

  • हळद - पाव चमचा

  • हिंग - चिमूटभर

  • तेल - २ चमचे

  • जीरे - अर्धा चमचा

  • खडा मसाला - मीरे ४, लवंगा २, दालचिनी १ इंच, वेलची २

  • पनीर - १५० ते २०० ग्रॅम

  • तांदूळ - १ ते १.५ वाटी (शिजवलेला)

  • मीठ - चवीनुसार

कृती :

सर्वात आधी पालक स्वच्छ धुऊन हलका उकळून घ्या आणि याचवेळी तांदूळही शिजायला ठेवा. नंतर शिजलेला पालक चांगला गाळून त्याची प्युरी तयार करा. मिक्सरमध्ये पालकासोबत मिरची, आलं आणि लसूण घालून एकसारखी वाटून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात जीरे आणि मीरे, लवंगा, दालचिनी, वेलची असा खडा मसाला टाका. मसाल्याचा सुगंध आला की त्यात पालकाची प्युरी ओता आणि हळद, हिंग, मीठ आणि धणे-जीरे पावडर घालून दोन-तीन मिनिटे परतून घ्या. मिश्रण चांगले परतले की त्यात शिजलेला भात घालून हलक्या हाताने एकजीव करा. शेवटी पनीरचे तुकडे घाला.हे तुकडे आधी बटरमध्ये हलके परतून घेतले तर अजूनच स्वाद येतो. पाच मिनिटे झाकण ठेवून वाफ काढा आणि सुगंधी, चविष्ट पालक-पनीर राइस सर्व्ह करा.

हा भात कोशिंबीर, रायतं किंवा तळलेल्या पापडासोबत एकदम मस्त लागतो!

आजची मतमोजणी रद्द! नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आता २१ डिसेंबरला

Drumstick Pickle : डायबिटीसवाल्यांसाठी बेस्ट! शेवग्याच्या शेंगांचं चटकदार लोणचं; १५ मिनिटांत रेडी...

PCOS ने त्रस्त आहात? 'या' योगासनांनी मिळेल नैसर्गिक आराम

झोपडपट्टी मुक्तीसाठी समूह पुनर्विकासाचा पर्याय

महायुतीच्या गोंधळात निवडणूक आयोगाची भर!