नेहमीची इडली विसरा! एकदा ट्राय करा चटपटीत बटाटा-रवा इडली 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

नेहमीची इडली विसरा! एकदा ट्राय करा चटपटीत बटाटा-रवा इडली

मऊसूत रव्याच्या इडलीमध्ये मसालेदार बटाट्याचे सारण भरले की या इडलीची चव आणखी खुलते.

किशोरी घायवट-उबाळे

इडली म्हटलं की नेहमी तांदूळ आणि उडदाच्या डाळीची इडली डोळ्यासमोर येते. पण तुम्ही कधी बटाटा आणि रव्याची इडली ट्राय केली आहे का? मऊसूत रव्याच्या इडलीमध्ये मसालेदार बटाट्याचे सारण भरले की या इडलीची चव आणखी खुलते. नाश्त्यासाठी झटपट आणि पोटभरीचा पर्याय हवा असेल, तर ही रेसिपी नक्की करून पाहा.

साहित्य :

  • ३ कप रवा

  • २ कप दही

  • २ उकडलेले बटाटे

  • १ टेबलस्पून फ्रूट सॉल्ट (ईनो)

  • १ टेबलस्पून लाल तिखट

  • १/२ टेबलस्पून हळद

  • २ हिरव्या मिरच्या

  • चवीनुसार मीठ

कृती :

१. इडलीचे पीठ तयार करा : एका भांड्यात रवा आणि दही घेऊन दोन्ही चांगले एकजीव करून घ्या. हे मिश्रण साधारण दोन तास झाकून ठेवा, जेणेकरून रवा चांगला मुरेल.

२. बटाट्याचे सारण तयार करा : तोपर्यंत उकडलेले बटाटे सोलून चांगले कुस्करून घ्या. त्यात लाल तिखट, हळद, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. तयार झालेले बटाट्याचे सारण बाजूला ठेवा.

३. फ्रूट सॉल्ट घाला : रव्याचे मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात फ्रूट सॉल्ट घाला आणि लगेच हलक्या हाताने मिसळा. फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर मिश्रण जास्त वेळ ठेवू नका.

४. इडलीमध्ये सारण भरा : इडलीच्या साच्याला हलके तेल लावा. प्रत्येक कप्प्यात आधी थोडे इडलीचे मिश्रण घाला. त्यावर बटाट्याचे सारण ठेवा आणि पुन्हा वरून इडलीचे मिश्रण घालून सारण झाकून टाका.

५. इडली वाफवून घ्या : इडलीपात्रात पाणी गरम करून त्यात साचा ठेवा. झाकण लावून इडल्या चांगल्या वाफवून घ्या. इडल्या शिजल्यानंतर त्या थोड्या थंड होऊ द्या आणि मग साच्यातून अलगद काढा.

६. सर्व्ह करा : गरमागरम बटाटा-रवा इडली चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा आणि या हटके इडलीचा आस्वाद घ्या.

टिप्स :

  • रवा आणि दह्याचे मिश्रण किमान २ तास मुरू दिल्यास इडलीचा पोत अधिक मऊ होण्यास मदत होते.

  • फ्रूट सॉल्ट घातल्यानंतर मिश्रण लगेच वापरा, त्यामुळे इडल्या चांगल्या फुलतात.

  • बटाट्याच्या सारणात तिखट आणि हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता.

  • इडलीच्या साच्यात पीठ पूर्ण भरू नका. वाफवल्यानंतर इडली फुलण्यासाठी वर थोडी जागा ठेवा.

  • इडली साच्यातून काढण्यापूर्वी काही मिनिटे थंड होऊ द्या. त्यामुळे इडल्या तुटण्याची शक्यता कमी होते.

  • अधिक चवदार इडलीसाठी बटाट्याच्या सारणात बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता.

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू