उन्हाळ्यातील चटपटीत रेसिपी; जेवणाची चव वाढवणारं कैरीचं लोणचं, एकदा खाल तर फॅन व्हाल 
लाईफस्टाईल

उन्हाळ्यातील चटपटीत रेसिपी; जेवणाची चव वाढवणारं कैरीचं लोणचं, एकदा खाल तर फॅन व्हाल

उन्हाळ्यात कैरीचं मसालेदार लोणचं घरच्या घरी कसं बनवायचं ते जाणून घ्या. सोपी रेसिपी, साहित्य आणि टिप्ससह सविस्तर माहिती वाचा.

किशोरी घायवट-उबाळे

उन्हाळा सुरू झाला की बाजारात कच्च्या आंब्यांची रेलचेल दिसते. या आंब्यापासून बनवलेलं आचार (लोणचं) म्हणजे जेवणाची चव वाढवणारा खास पदार्थ. थोड्या मसाल्यांसह घरच्या घरी सहज तयार होणारं हे लोणचं दीर्घकाळ टिकतं आणि प्रत्येक घास अधिक चविष्ट बनवतं.

साहित्य :

  • कच्चे आंबे - १ किलो

  • धणे (Coriander seeds) - १ टेबलस्पून

  • जिरे - १ टेबलस्पून

  • काळी मिरी - १ टीस्पून

  • काळी मोहरी - १/२ टेबलस्पून

  • पिवळी मोहरी - १ टेबलस्पून

  • मेथी दाणे - १/२ टीस्पून

  • मीठ - २ टीस्पून (चवीनुसार)

मसाले:

  • हळद - २ टीस्पून

  • आमचूर पावडर - २ टीस्पून

  • आचार मसाला - ४ टेबलस्पून

  • लाल तिखट - १ टेबलस्पून

  • काश्मिरी तिखट - १ टेबलस्पून

इतर:

  • तेल - २५० मि.ली.

  • व्हिनेगर - १०० मि.ली.

कृती :

सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून कोरडी करा आणि कैरीचे उभे पातळ काप करा. कढईत धणे, जिरे, मिरी, मोहरी आणि मेथी हलक्या आचेवर भाजून घ्या आणि जाडसर पूड करा.

एका भांड्यात कैरीचे तुकडे घ्या. त्यात मीठ, हळद, आमचूर पावडर, लाल तिखट आणि आचार मसाला घालून नीट मिसळा. तयार केलेली मसाल्याची पूड त्यात घाला.

एका पॅनमध्ये तेल गरम करून पूर्ण थंड होऊ द्या आणि मग मिश्रणात घाला. शेवटी व्हिनेगर घालून सर्व मिश्रण चांगलं एकजीव करा. तयार लोणचं स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.

टिप्स :

  • लोणचं बनवताना कैऱ्या पूर्ण कोरडया असाव्यात.

  • तेल पूर्ण थंड झाल्यावरच मिश्रणात घालावं.

  • स्वच्छ आणि कोरड्या बरणीत साठवल्यास लोणचं जास्त काळ टिकतं.

  • चवीनुसार तिखट आणि मीठ कमी-जास्त करू शकता.

घरच्या घरी बनवलेलं कच्च्या कैरीचं लोणचं हे केवळ चविष्टच नाही, तर दीर्घकाळ टिकणारं आणि आरोग्यदायीही असतं. उन्हाळ्यातील जेवणात या लोणच्यामुळे खास चव येते.

CJP Protest : 'त्या' आंदोलकांची सुटका करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाराष्ट्रासह ७ राज्यांना आदेश

'चुकून व्हिडिओ हटवला'; पंतप्रधान मोदींच्या फेसबुक पोस्टप्रकरणी Meta ची माफी

जपानमध्ये ७.१ तीव्रतेचा भूकंप; त्सुनामीचा इशारा, हादरवणारे Video व्हायरल

पत्नीचा जीव जात असताना मोबाईलमध्ये VIDEO शूट; पतीच्या कृत्याने पोलिसही हादरले

आरक्षणाच्या व्हायरल पोस्टवर शिल्पा शेट्टीचा संताप; म्हणाली - "माझ्या नावाने खोटी माहिती पसरवली...