सणासुदीसाठी खास मेजवानी! गुलाबाचा सुगंध, बदामाची चव अन् खिरीचा गोडवा; नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

सणासुदीसाठी खास मेजवानी! गुलाबाचा सुगंध, बदामाची चव अन् खिरीचा गोडवा; नक्की ट्राय करा ही सोपी रेसिपी

नेहमीच्या तांदळाच्या खिरीला थोडा हटके ट्विस्ट द्यायचा असेल, तर बदाम आणि गुलाबाच्या सुगंधाने तयार होणारी बदाम-गुलाब खीर नक्की करून पाहा.

किशोरी घायवट-उबाळे

सण-उत्सव म्हटलं की घरात गोड पदार्थाची लगबग सुरू होते. श्रीखंड, पुरणपोळी, मोदक यांसोबतच खीर हा अनेकांचा आवडता पारंपरिक गोड पदार्थ आहे. नेहमीच्या तांदळाच्या खिरीला थोडा हटके ट्विस्ट द्यायचा असेल, तर बदाम आणि गुलाबाच्या सुगंधाने तयार होणारी बदाम-गुलाब खीर नक्की करून पाहा. दूध, तांदूळ, बदाम आणि गुलाबपाकळ्यांच्या मदतीने तयार होणारी ही खीर चवीला स्वादिष्ट आणि दिसायलाही आकर्षक लागते. सणासुदीच्या जेवणानंतर डेझर्ट म्हणून ही खीर उत्तम पर्याय ठरू शकते.

साहित्य :

  • २ लिटर फुल फॅट दूध

  • १२० ग्रॅम तांदूळ

  • ४० ग्रॅम साखर

  • ३ ते ४ थेंब गुलाबपाणी

  • १० ग्रॅम सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या

  • १०० ग्रॅम बदाम

  • २५ ग्रॅम बदामाचे काप

कृती :

१. तांदूळ भिजवा - सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून साधारण २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.

२. दूध आटवा - जाड बुडाच्या पातेल्यात दूध घेऊन ते उकळू द्या. दूधाला उकळी आल्यानंतर गॅस मंद करा आणि दूध आटवत राहा. दूध साधारण निम्मे होईपर्यंत ते मंद आचेवर शिजू द्या.

३. तांदूळ घाला - भिजवलेल्या तांदळातील पाणी पूर्णपणे काढून तो आटलेल्या दुधात घाला. मंद आचेवर तांदूळ पूर्णपणे शिजेपर्यंत खीर ढवळत राहा. तांदूळ शिजल्यानंतर मिश्रण घट्ट होऊ लागेल.

४. बदाम आणि साखर मिसळा - आता त्यात चिरलेले बदाम घाला. मंद आचेवर आणखी सुमारे १५ मिनिटे शिजवा. खीर घट्ट आणि क्रीमी झाली की त्यात साखर घालून चांगले मिसळा.

५. गुलाबाचा सुगंध द्या - गॅस बंद करून खीर थोडी थंड होऊ द्या. खीर पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यात गुलाबपाण्याचे काही थेंब घाला आणि व्यवस्थित मिसळा. त्यानंतर खीर काही वेळासाठी फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा.

६. सजावट करा - बदामाचे काप ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानावर सुमारे ५ मिनिटे भाजून घ्या. ते सोनेरी रंगाचे झाले की बाहेर काढा. सर्व्ह करण्यापूर्वी खिरीवर भाजलेले बदामाचे काप आणि सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवा.

खीर बनवताना लक्षात ठेवा

  • खीर अधिक क्रीमी हवी असेल तर फुल फॅट दूध वापरा.

  • दूध आटवताना सतत किंवा अधूनमधून ढवळत राहा, जेणेकरून दूध पातेल्याच्या तळाला लागू नये.

  • तांदूळ मंद आचेवर शिजवल्याने खिरीला छान घट्टपणा आणि चव येते.

  • गुलाबपाणी खीर गरम असताना घालू नका. खीर थोडी थंड झाल्यावर गुलाबपाणी मिसळल्यास त्याचा सुगंध अधिक चांगला राहतो.

  • गुलाबपाणी जास्त प्रमाणात वापरू नका; अन्यथा त्याची चव खिरीवर हावी होऊ शकते.

  • बदामाचे काप शेवटी घातल्यास त्यांचा कुरकुरीतपणा आणि स्वाद चांगला टिकतो.

  • खीर थंड करून सर्व्ह केल्यास बदाम आणि गुलाबाचा स्वाद अधिक खुलतो.

सर्व्हिंग टिप

ही खीर थंडगार सर्व्ह करा. वरून भाजलेले बदामाचे काप, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या आणि हवे असल्यास थोडे बदाम-पिस्त्याचे काप घालून सजवू शकता. सणासुदीच्या जेवणानंतर किंवा पाहुण्यांसाठी डेझर्ट म्हणून ही खीर नक्कीच खास ठरेल.

विवादे नैव कर्तव्यं प्रधानैः सह कर्हिचित्

आजचे राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Air India Express : ३६,००० फूट उंचीवर तांत्रिक बिघाड; अबुधाबीला जाणारे विमान कोचीला परतले, नेमकं काय घडलं?

"कचरा का टाकला?" म्हणणाऱ्या पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; विरारमध्ये महिला गोविंदा पथकाचा राडा, Video

Delhi Building Collapse : क्षणार्धात इमारत जमीनदोस्त; मृतांचा आकडा वाढला, थरकाप उडवणारा CCTV व्हिडीओ समोर