Shravan Special Recipe : उपवासाचा नवा बेत! वाटीभर साबुदाण्यांपासून बनवा खुसखुशीत थालीपीठ; रेसिपी आताच नोट करा 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Shravan Special Recipe : उपवासाचा नवा बेत! वाटीभर साबुदाण्यांपासून बनवा खुसखुशीत थालीपीठ; रेसिपी आताच नोट करा

उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी साबुदाणा थालीपीठ करून पाहा. साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाण्याच्या कुटापासून बनवा खुसखुशीत थालीपीठ.

Mayuri Gawade

श्रावणात उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा असे पदार्थ हमखास केले जातात. पण रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी साबुदाण्यापासून काहीतरी वेगळं करून पाहा. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारं आणि बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ असं साबुदाणा थालीपीठ उपवासाच्या ताटाची चव नक्कीच वाढवेल.

साहित्य -

  • १ वाटी साबुदाणा

  • २ उकडलेले बटाटे

  • १ वाटी शेंगदाण्याचा कूट

  • १-२ हिरव्या मिरच्या

  • चवीनुसार मीठ

  • थोडी काळीमिरी पावडर

  • तूप

कृती -

सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उरलेलं पाणी पूर्णपणे काढून साबुदाणा बाजूला ठेवा.

यानंतर बटाटे उकडून त्यांची साल काढा आणि ते चांगले मॅश करून घ्या. त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ आणि काळीमिरी पावडर घाला. हे सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर मिश्रण तयार करा.

आता या मिश्रणाचा एक गोळा घ्या. ओल्या कापडावर किंवा रुमालावर थापून थालीपीठाचा आकार द्या. थालीपीठ थापताना ते फार जाड ठेवू नका, म्हणजे ते छान कुरकुरीत होईल.

गरम तव्यावर थालीपीठ अलगद सोडा आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. बाजूने थोडं तूप सोडलं की थालीपीठ आणखी खुसखुशीत होईल.

दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि कुरकुरीत झालं की गरमागरम साबुदाणा थालीपीठ तयार! हे थालीपीठ काकडीच्या कोशिंबिरीसोबत खाल्लं तर चव आणखी खुलते.

राहुल, प्रियांका स्थानबद्ध; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडी आक्रमक, ५० खासदारांसह २५० जण पोलिसांच्या ताब्यात

महायुती, आघाडीत बंडाचे झेंडे; विधान परिषद निवडणुकीत युती, आघाडी धर्माला तिलांजली

पक्षांतर करणाऱ्यांना चिन्ह देता येईल का? शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

बसमध्ये कोंबले, नाशिकला धाडले; काँग्रेस कार्यालयात आदिवासी विद्यार्थी-पोलिसांमध्ये झटापट, ‘टिळक भवन’ला आखाड्याचे स्वरूप

आशुतोष दीक्षित बनले नवे हवाई दल प्रमुख