Shravan Special : उपवासाचा थकवा मिनिटांत होईल गायब; एनर्जी वाढवण्यासाठी प्या 'हे' खास ड्रिंक 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

Shravan Special : उपवासाचा थकवा मिनिटांत होईल गायब; एनर्जी वाढवण्यासाठी प्या 'हे' खास ड्रिंक

श्रावणातील उपवासामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतोय? नारळपाणी, सब्जा, नारळाची मलई आणि लिंबापासून बनवा हे सोपं एनर्जी ड्रिंक.

Mayuri Gawade

श्रावण सुरू झाला की उपवासांची मालिकाच सुरू होते. श्रावणी सोमवार, शुक्रवार, शनिवार अशा विविध दिवशी अनेक जण उपवास करतात. काही जण तर संपूर्ण श्रावणात दिवसातून एकदाच जेवतात. त्यामुळे उपवासाच्या काळात थकवा, अशक्तपणा आणि एनर्जी कमी झाल्यासारखं वाटू शकतं. अशावेळी घरच्या घरी तयार होणारं हे साधं पेय ट्राय करता येईल.

साहित्य

  • १ ग्लास नारळपाणी

  • १ चमचा पाण्यात भिजवलेले सब्जाचे बी

  • थोडी ताजी नारळाची मलई

  • थोडं लिंबू

कृती

सर्वप्रथम एका ग्लासमध्ये नारळपाणी घ्या. त्यात पाण्यात भिजवलेले सब्जाचे बी घाला. त्यानंतर ताजी नारळाची मलई आणि थोडा लिंबाचा रस मिसळा. सर्व साहित्य नीट एकत्र करा. उपवासाच्या दिवशी हे ताजं पेय घेता येईल.

नारळपाण्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात, तर सब्जामध्ये फायबर असते. त्यामुळे हे पेय शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि पोट भरल्यासारखं वाटण्यास मदत करू शकतं. नारळाची मलई आणि लिंबामुळे चवही छान येते.

उपवास करताना थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर आहाराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मात्र सतत चक्कर येणे, जास्त अशक्तपणा जाणवणे किंवा इतर त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग