संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी स्वादिष्ट आणि सोपे हवे असेल तर चटपटीत आलू टिक्की उत्तम पर्याय ठरते. ही टिक्की फक्त मोठ्यांना नाही तर लहान मुलांनाही खूप आवडते. शिवाय, जर तुम्ही घरीच बर्गर बनवणार असाल, तर त्यातही ही आलू टिक्की वापरता येते. चल तर मग याची सोपी रेसिपी जाणून घेऊ...
साहित्य:
बटाटे - ३ ते ४ (उकडलेले)
कॉर्न फ्लोअर - २ चमचे
हिरव्या मिरच्या - २
आले-लसूण पेस्ट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १/२ चमचा
जिरेपूड - १/२ चमचा
कोथिंबीर - थोडी बारीक चिरलेली
पुदिना - काही पानं
चाट मसाला - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
तेल - तळण्यासाठी
कृती:
सर्वप्रथम बटाटे उकडून छान किसून घ्या. एका बाऊलमध्ये किसलेले बटाटे, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर एकत्र करा. यामध्ये आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, जिरेपूड, चाट मसाला आणि मीठ घालून मिश्रण नीट मळून घ्या. आता त्यात कॉर्न फ्लोअर, पुदिना आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा. तयार मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताने हलकेच दाबून टिक्कीचा आकार द्या. पॅनमध्ये तेल गरम करून टिक्क्या शॅलो फ्राय करा, दोन्ही बाजू सोनेरी होईपर्यंत तळा. गरमागरम टिक्की चिंचेच्या किंवा हिरव्या मिरच्यांच्या चटणीसह सर्व्ह करा.