उन्हाळ्यात थंडगार 'शहाळ्याचे आईस्क्रीम'; घरच्या घरी बनवा हेल्दी आणि चवदार डेझर्ट 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात थंडगार 'शहाळ्याचे आईस्क्रीम'; घरच्या घरी बनवा हेल्दी आणि चवदार डेझर्ट

उन्हाळ्यात थंडगार आणि नैसर्गिक गोडवा असलेले शहाळ्याचे आईस्क्रीम घरीच सहज तयार करा. कमी साहित्यात बनणारा हा हेल्दी डेझर्ट शरीराला थंडावा देतो आणि चवीलाही उत्तम लागतो.

Mayuri Gawade

उन्हाळ्याची चाहूल लागताच थंड पदार्थांची ओढ आपोआप वाढते. बाहेरून आणलेले आईस्क्रीम खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेला पर्याय अधिक सुरक्षित आणि पौष्टिक ठरतो. अशातच शहाळ्यापासून तयार होणारे आईस्क्रीम हा एक नैसर्गिक, हलका आणि चवदार पर्याय आहे, जो शरीराला थंडावा देण्यास मदत करतो.

बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीममध्ये साखर, कृत्रिम फ्लेवर्स आणि रंग यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्याऐवजी शहाळ्याचे आईस्क्रीम नैसर्गिक गोडवा आणि पोषणमूल्यांनी भरलेले असल्याने उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय मानला जातो.

साहित्य

  • मऊ खोबर

  • शहाळ्याचे पाणी

  • काजू

  • मलाई

  • साखर

  • सुका मेवा

कृती

  • सर्वप्रथम शहाळ्याचे पाणी आणि मऊ खोबर वेगळे काढून घ्या

  • खोबऱ्याचे छोटे तुकडे करा

  • काजू काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा

  • मिक्सरमध्ये खोबर, काजू, मलाई, नारळाचे पाणी आणि साखर घालून बारीक पेस्ट तयार करा

  • तयार मिश्रण मोल्ड किंवा वाट्यांमध्ये घाला

  • वरून खोबऱ्याचे तुकडे आणि सुका मेवा घाला

  • हे मिश्रण फ्रिजमध्ये सुमारे ६ तास सेट होण्यासाठी ठेवा

सर्व्ह करताना

थंडगार झाल्यानंतर हे आईस्क्रीम सर्व्ह करा. नैसर्गिक चव आणि हलका गोडवा यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेत स्वादिष्ट पदार्थ खायचा असेल, तर शहाळ्याचे आईस्क्रीम हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो.

Mumbai : मंडपांना थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; प्रति खड्डा दोन हजार दंड वसुली, BMC चा इशारा

नोकरी गेल्यास अमेरिकेतून बाहेर; ६० दिवसांचा सवलतीचा कालावधी रद्द करण्याची तयारी, ट्रम्प प्रशासनाचा H-1B व्हिसाबाबत कठोर पवित्रा

NSS विद्यार्थ्यांची 'निर्माल्य मुक्ती' मोहीम; प्लास्टिक-थर्माकोल वेगळे करून खताची निर्मिती

पुण्यातील १० दिवसांची दारूबंदी रद्द; उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर निर्णय मागे, गणेशोत्सवात केवळ दोनच दिवस निर्बंध

‘सर्वच न्यायालये बहुसंख्याकवादाकडे’; SC चे निवृत्त न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांनी व्यक्त केली चिंता