लाईफस्टाईल

मॅगी सँडविचचा नवा ट्रेंड; झटपट नाश्त्यासाठी तरुणांची पहिली पसंती

कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव हे या सँडविचचे खास वैशिष्ट्य आहे. घरच्या-घरी सोप्या पद्धतीने मॅगी सँडविच कसा बनवायचा, जाणून घेऊया.

किशोरी घायवट-उबाळे

दोन मिनिटांत तयार होणारी मॅगी आता सँडविचमध्येही चवीने खाल्ली जात आहे. शाळकरी मुले, कॉलेज तरुण-तरुणी आणि नोकरी करणाऱ्यांमध्ये मॅगी सँडविच झपाट्याने लोकप्रिय होत आहे. कमी साहित्य, कमी वेळ आणि जबरदस्त चव हे या सँडविचचे खास वैशिष्ट्य आहे. घरच्या-घरी सोप्या पद्धतीने मॅगी सँडविच कसा बनवायचा, जाणून घेऊया.

साहित्य

  • मॅगी नूडल्स – १ पॅकेट

  • मॅगी मसाला – १ सॅशे

  • ब्रेड स्लाइस – ४

  • कांदा – १ बारीक चिरलेला

  • टोमॅटो – १ बारीक चिरलेला

  • सिमला मिरची – अर्धी बारीक चिरलेली

  • हिरवी मिरची – १ आवडीनुसार

  • लोणी / बटर – आवश्यकतेनुसार

  • मीठ – चवीनुसार

  • लाल तिखट – चिमूटभर

  • चीज – २ स्लाइस / किसलेले (ऐच्छिक)

कृती

  • सर्वप्रथम मॅगी नेहमीप्रमाणे उकडून घ्या. पाणी पूर्ण आटल्यावर त्यात मॅगी मसाला घालून नीट मिसळा आणि थंड होऊ द्या.

  • एका कढईत थोडे लोणी गरम करून त्यात कांदा, सिमला मिरची, हिरवी मिरची घालून थोडे परतून घ्या. त्यात उकडलेली मॅगी, टोमॅटो, मीठ आणि लाल तिखट घालून २ मिनिटे परता.

  • आता ब्रेडच्या एका स्लाइसवर लोणी लावा. त्यावर तयार मॅगी मिश्रण पसरवा. त्यावर चीज घालून दुसरी ब्रेड स्लाइस ठेवा.

  • तवा गरम करून सँडविच दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम मॅगी सँडविच सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

सर्व्हिंग टिप

मॅगी सँडविच टोमॅटो सॉस, मेयोनीज किंवा हिरव्या चटणीसोबत खाल्ल्यास अधिक चविष्ट लागतो.

समृद्वी महामार्गावरून प्रवास करताय? आजपासून ५ दिवस 'ब्लॉक'; कुठे आणि किती वेळासाठी रोखणार वाहतूक?

भांडण सोडवल्याची 'शिक्षा'; ४५ दिवस तुरूंगवास भोगल्याचा दावा, म्हणाला - “मैं सेंट्रल जेल से गोरा होकर आया”! तरुणाचा VIDEO व्हायरल

महिलेने मध्यरात्री ऑर्डर केलं उंदीर मारण्याचं औषध; Delivery Boy ला आला आत्महत्येचा संशय, मग जे घडलं...

Thane : घोडबंदर घाटात उतरणीवर कंटेनरच्या धडकेमुळे विचित्र अपघात; अनेक वाहने एकमेकांवर आदळली, चालक फरार - Video

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक CORS स्टेशन उभारणार; भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार, जाणून घ्या सविस्तर