लाईफस्टाईल

पती-पत्नीतील प्रेम वाढवतात 'या' ७ गोष्टी

पती-पत्नीच्या नात्यात प्रेम टिकून राहावं, असं वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

Suraj Sakunde
विवाह हे जगातील सर्वात सुंदर बंधन मानलं जातं. जर तुमच्या आवडत्या व्यक्तिशी तुमचा विवाह झाला तर यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणतीही नाही.
लग्नानंतर सुरुवातीच्या काळात पती-पत्नीत खूप प्रेम राहतं. मात्र जसजसा वेळ जातो, तसा नात्यात चढउतार येऊ शकतात.
जर तुम्हालाही तुमच्या वैवाहिक जीवनातील प्रेम कमी होऊ नये, असं वाटत असेल, तर काही टिप्स फॉलो करायला हव्यात.
पती-पत्नीत प्रेम वाढवण्यासाठी अधूनमधून हॉटेलमध्ये जेवायला जावं.
घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्यांमुळं बऱ्याचदा आपल्या जोडीदारासाठी वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत थोडा वेळ काढून जोडीदारासोबत सुंदर ठिकाणी फिरायला जावं.
पती-पत्नीत प्रेम वाढण्यासाठी चित्रपट पाहायला जाणं, खूप फायदेशीर ठरू शकते.
विविध कार्यक्रम, वाढदिवस किंवा इतर वेळी आपल्या जोडीदार छान छान गिफ्ट द्या. जोडीदाराच्या चांगल्या गोष्टींची मनमोकळेपणानं स्तुती करा.
नात्यात प्रेम टिकून राहण्यासाठी सेक्सुअल हेल्थ राखणं गरजेचं आहे. त्यामुळं दोघांनीही फिट राहायला हवं.
नात्यातील प्रेम वाढण्यासाठी दोघांमध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. दोघांनीही एकमेकांचा सन्मान करायला हवा.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुका आधी होणे आवश्यक; सुप्रीम कोर्टाचा विशेष अनुमती याचिकेत हस्तक्षेपाला नकार