लाईफस्टाईल

सर्व काही करूनही वजन कमी होत नाही? योगाचार्य उमंग यांचा त्रिफळा उपाय ठरेल फायदेशीर

अनेकजण आहार, व्यायाम, उपवास अशा सर्व गोष्टी करूनही वजन कमी करण्यात अपयशी ठरतात. काहींना पोटावर चरबी साठते, काहींना सूज वाटते, तर काहीजणांना कायम थकवा जाणवतो. यावर योगाचार्य उमंग यांनी एक पारंपरिक पण प्रभावी उपाय सुचवला आहे. तो उपाय आहे - त्रिफळा चूर्ण.

नेहा जाधव - तांबे

अनेकजण आहार, व्यायाम, उपवास अशा सर्व गोष्टी करूनही वजन कमी करण्यात अपयशी ठरतात. काहींना पोटावर चरबी साठते, काहींना सूज वाटते, तर काहीजणांना कायम थकवा जाणवतो. यावर योगाचार्य उमंग यांनी एक पारंपरिक पण प्रभावी उपाय सुचवला आहे. तो उपाय आहे - त्रिफळा चूर्ण.

योगाचार्य उमंग यांच्या मते, "त्रिफळा हे आयुर्वेदातील एक अत्यंत प्रभावी रसायन आहे. ते शरीरातील विषारी द्रव्य (toxins) बाहेर टाकण्यास मदत करते आणि पचनक्रिया सुधारते. वजन कमी होण्यासाठी चयापचय (metabolism) सशक्त असणे गरजेचे आहे. यासाठी त्रिफळा फार उपयुक्त ठरतो."

त्रिफळा चूर्णाचे प्रमुख फायदे:

  • पचनक्रिया सुधारतो - अन्नाचे योग्य पचन करून अपचन, गॅस, आम्लपित्त यावर नियंत्रण ठेवतो.

  • डिटॉक्स गुणधर्म - शरीरातील जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर टाकतो.

  • वजन कमी करण्यास मदत - चयापचय सुधारल्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

  • कब्ज दूर करतो - नियमित मलविसर्जनास मदत होते, जे वजन नियंत्रणासाठी महत्त्वाचे आहे.

  • त्वचेवर चमक येते - शरीराच्या आतून शुद्धी झाल्याने त्वचा निरोगी आणि तेजस्वी होते.

कसे घ्यावे त्रिफळा चूर्ण?

उमंग यांच्या मार्गदर्शनानुसार रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात मिसळून घ्या. यामुळे शरीराची शुद्धी होऊन झोपही शांत लागते. त्रिफळाचा अति वापर टाळा. कुठल्याही गंभीर आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. यासोबतच त्यांनी वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, योगसाधना आणि सकारात्मक जीवनशैली हवी असे सांगितले. योगाचार्य उमंग म्हणतात, “शरीर स्वच्छ, मन शांत आणि दिनचर्या नियमित असेल, तर वजन हळूहळू पण कायमचे कमी होईल.”

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात