महागड्या क्रीम विसरा! हिवाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक फेस मास्क! 
लाईफस्टाईल

महागड्या क्रीम विसरा! हिवाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक फेस मास्क!

दोन चमचे मध आणि गुलाबजल एकत्र करा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी...

Mayuri Gawade

हिवाळा आला की सगळ्यात मोठी भेडसावणारी समस्या म्हणजे कोरडी, निस्तेज त्वचा. या दिवसांत हवेतली थंडी आणि कोरडेपणा त्वचेतून नैसर्गिक आर्द्रता शोषून घेतो. परिणामी, चेहऱ्यावर येतो निस्तेजपणा. बाजारातील क्रीम्स किंवा लोशन्स काही वेळापुरतेच आराम देतात. पण घरातच असणाऱ्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेले फेस मास्क त्वचेला खोलवर पोषण देतात. तुमची त्वचा पुन्हा मुलायम, चमकदार आणि तजेलदार बनवू शकतात. चला तर पाहूया, या हिवाळ्यात घरच्या घरी कसे बनवाल नैसर्गिक हायड्रेटिंग फेस मास्क!

१. पपई, मध आणि दुधाचा फेस मास्क

पिकलेली पपई मॅश करा आणि त्यात एक चमचा मध आणि थोडं दूध मिसळा. हा मास्क चेहऱ्यावर १५–२० मिनिटे लावा आणि कोमट पाण्याने धुवा. तो त्वचेला उजळ करतो आणि डाग कमी करतो.

२. ॲव्होकॅडो आणि मधाचा फेस मास्क

एक पिकलेला ॲव्होकॅडो आणि एक चमचा मध एकत्र मिक्स करा. हा फेस मास्क चेहऱ्यावर १० मिनिटे ठेवा. हा त्वचेला खोलवर पोषण देतो आणि मऊ करतो.

३. ऑलिव्ह ऑईल आणि ग्रीन टी मास्क

थोडं ऑलिव्ह ऑईल आणि ग्रीन टीचे काही थेंब एकत्र करा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा. हा मास्क त्वचेला मॉइश्चर देतो आणि कोरडेपणा दूर करतो.

४. बेसन, मध आणि दही मास्क

बेसन, मध आणि दही समप्रमाणात घेऊन पेस्ट बनवा. ती चेहऱ्यावर लावून कोरडे होऊ द्या आणि कोमट पाण्याने धुवा. हा मास्क त्वचा स्वच्छ करून तिला नैसर्गिक चमक देतो.

५. काकडी आणि ॲलोवेरा जेल मास्क

काकडीची पेस्ट आणि ताजं ॲलोवेरा जेल एकत्र करून चेहऱ्यावर ५–१० मिनिटे ठेवा. हा मास्क त्वचेला थंडावा, आराम आणि हायड्रेशन देतो.

६. केळी आणि नारळ दूध मास्क

एक केळी मॅश करा आणि त्यात दोन चमचे नारळ दूध घाला. चेहऱ्यावर लावून १५–२० मिनिटांनी धुवा. हा मास्क त्वचेला पोषण देऊन मुलायम बनवतो.

७. मध आणि गुलाबपाणी मास्क

दोन चमचे मध आणि गुलाबजल एकत्र करा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा. हा मास्क त्वचेला हायड्रेट करून तिच्यात नैसर्गिक उजळपणा आणतो.

८. दही आणि ओटमील मास्क

दही आणि ओटमील समान प्रमाणात घेऊन पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवा. हा मास्क त्वचेतील मृत पेशी काढून टाकतो आणि ती मऊ करतो.

टीप :

फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ धुवा आणि संवेदनशील त्वचा असल्यास patch test जरूर करा. या नैसर्गिक फेस मास्कचा नियमित वापर केल्यास तुमची त्वचा हिवाळ्यातही चमकदार, हायड्रेटेड आणि निरोगी राहील.

(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे ५३ वे सरन्यायाधीश होणार; २४ नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

किडनॅपर रोहित आर्यचा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संबंध? सरकारने करोडो रुपये बुडवल्याचा आरोप; केसरकर म्हणाले, "होय मी त्याला...

मोठी बातमी! १७ मुलांना ओलिस ठेवणारा आरोपी पोलिस चकमकीत ठार; नेमकं काय घडलं?

Mumbai : ऑडिशनच्या बहाण्याने १७ अल्पवयीन मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण; अखेर १ तासाच्या थरार नाट्यानंतर मुलांची सुटका, आरोपी ताब्यात

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चौकशी आयोगाची कारणे दाखवा नोटिस; उत्तर न दिल्यास होणार कारवाई