Freepik
लाईफस्टाईल

World Hypertension Day 2024: 'हे' पदार्थ करतील हाय बीपी नियंत्रित करण्यास मदत!

Tejashree Gaikwad

High BP: उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर ही आजच्या काळातही गंभीर समस्या (Health Care) बनली आहे. फक्त व्यानए जास्त असलेल्यांमध्येच नाही तर आजकाल अगदी लहान वयातच हा आजार होत आहे. जगभरातील लाखो लोक उच्च रक्तदाबाच्या आजराने ग्रासले आहे. यामुळे हृदयविकार होतात. याच कारणामुळे या गंभीर समस्येबद्दल जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने, दरवर्षी १७ मे रोजी जागतिक उच्च रक्तदाब दिन (World Hypertension Day 2024) साजरा केला जातो. खराब जीवनशैली आणि अनियंत्रित जीवनशैलीमुळे लोकांमध्ये ही समस्या वाढत आहे. आकडेवारीनुसार, दरवर्षी जगभरात ७.५ लाख लोक उच्च रक्तदाबामुळे मरतात.

काय आहे या दिवसाचा इतिहास?

जागतिक उच्च रक्तदाब दिन हा दिवस १४ मे २००५ रोजी वर्ल्ड हायपरटेन्शन लीग (WHL) ने सुरू केला. नंतर हा दिवस १७ मे रोजी साजरा केला जाऊ लागला. उच्च रक्तदाबाची वाढत्या केसेस बघून या दिवसाची सुरुवात झाली. जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता पसरवून उच्च रक्तदाब रोखण्याबरोबरच तो वाढण्यापासून रोखता येईल.

हा आजार औषधे आणि योग्य जीवनशैलीच्या मदतीने नियंत्रित केला जाऊ शकतो. अशाच काही पदार्थांबद्दल जाणून घ्या, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता.

तुळस

तुळशीला तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. अगदी प्रत्येक भारतीयांच्या घरात तुळशीचं रोप असतं. यामध्ये असलेले युजेनॉल सारखे संयुगे नैसर्गिक कॅल्शियम चॅनेल ब्लॉकर म्हणून काम करतात आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.

जवसाच्या बिया

जवसाच्या बिया हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. याचं नियमित सेवन करावे.

लसूण

लसूण हा बहुतेक प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात संपतो. लसूण फक्त जेवणाची चवच वाढवायला मदत करतो असं नाही तर, रक्तदाब व्यवस्थापनात लसूण फायदेशीर आहे.

दालचिनी

जेवणाची चव दुप्पट करणारी दालचिनी, रक्तदाब कमी करण्यालाही मदत करते.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस