महाराष्ट्र

गुढीपाडव्यानिमित्त महिलांसाठी खुशखबर! खासगी बसमध्येही तिकीट दरात ५० टक्के सूट

एकीकडे एसटी महामंडळाने सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात महिलांना ५० टक्के सूट दिल्यानंतर आता खासगी ट्रॅव्हल्स असोसिएशननेही घेतला निर्णय

प्रतिनिधी

महाराष्ट्रात एसटी महामंडळाने महिलांना सर्व प्रकारच्या बस तिकिटांच्या दरामध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता खासगी बसेसमध्येही महिलांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून गुढीपाडव्याच्या दिवसापासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा निर्णय चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने जाहीर केल्यानंतर महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काल चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या खासगी ट्रॅव्हल्स मालकांची बैठक पार पडली. यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. आज गुढीपाडव्याच्या शूभमुहूर्तावर या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केल्याची माहिती सोसिएशनच्या ट्रॅव्हल्स मालकांनी दिली आहे. यामुळे आता एसटी पाठोपाठ आता ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. तसेच, या असोसिएशनच्या सदस्यांनी, संपूर्ण राज्यातील खासगी ट्रॅव्हल्स असा निर्णय घेऊ शकतात, अशी आशा व्यक्त केली आहे.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप