महाराष्ट्र

शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चौघांवर गुन्हा दाखल ; नोकरी देण्याच्या आमिषाने केला अत्याचार

तरुणीला बँकेत नोकरीसाठी मुलाखत असल्याचे सांगत पु्ण्यात बोलावले

नवशक्ती Web Desk

पश्निम बंगाल येथून नोकरीसाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल येथून आलेल्या २८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, एक महिला आरोपी आणि अर्जुन ठाकरे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणीला एका संकेतस्थळावर एका महिलेचा नंबर मिळाला. त्या महिलेने तरुणीला बँकेत नोकरीसाठी मुलाखत असल्याचे सांगत पु्ण्यात बोलावले. यानंतर नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी अर्जुन ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले.

यानंतर ठाकरेने तिची चिरागउद्दीन शेख, महेश्वर रेड्डी आणि महिला आरोपीशी ओळक करुन दिली. तसंच १५ मे रोजी आरोपींच्या पुण्यातील कार्यालयात बोलावले तिथे ठाकरे यांनी फिर्यादी मुलीवर विनयभंग केला. तर ३ जून रोजी पुण्यातील कार्यालयात शौचालयात जाऊन रेड्डी याने फिर्यादी तरुणीवर अतिप्रसंग केला. यानंतर पीडिता जाऊ लागल्यावर महिलेने तिला अडवून आम्ही देखील वेगवेगळ्या मुली रेड्डी याला दिल्या आहेत. तू त्यांना खूश कर, असं सांगितलं. यानंतर चिरागउद्दीन याने पीडितेला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावले. ४ जून रोजी रेड्डीने पीडित तरुणीला व्हिडिओ कॉल करुन अश्लील जाळे दाखवीले, असं पीडितेने दिलेल्या फिर्यादीत नमुद आहे.

गुजरातच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; तरुण नेते हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, रिवाबा जडेजानेही घेतली शपथ

'बदला' घेण्यासाठी महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर

इंजिनिअर ते करणी सेनेची महिला प्रमुख, रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातची नवी मंत्री, अवघ्या तीन वर्षात मिळवलं यश

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन