महाराष्ट्र

सदाभाऊ खोतांचा रस्ता अडवणाऱ्या हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणातुन हॅाटेलचे मालक अशोक शिंगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला

वृत्तसंस्था

भाजप नेते सदाभाऊ खोत हे राजकारणातील वेगवेगळ्या विषयामुळे नेहमीच चर्चेत असतात. पण या वेळेस ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. २०१४ च्या निवडणुकी पासुन भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी हॅाटेलचे बील थकवले असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ज्या हॅाटेलचे बील थकीत आहे त्या हॅाटेल मालकाने चक्क सदाभाऊ खोत यांचा ताफा अडवला. हॅाटेलचे मालक अशोक शिंगारे यांनी सदाभाऊ खोत हे पंचायत राजच्या कामासाठी सांगोला दौर्‍यावर गेले असताना त्यांना अडवून थकीत बिलासंदर्भात जाब विचारण्यास सुरुवात केली.त्यामुळे सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणातुन हॅाटेलचे मालक अशोक शिंगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

या सगळ्या प्रकरणामुळे सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेतली. २०१४ च्या निवडणुकीत माझा प्रचार करणारे कार्यकर्ते व पक्षाचे लोक घरातील भाकरी बांधून प्रचार करत होते. त्याकाळी आमच्याकडे पैसे नसल्याने आमचा एकही कार्यकर्ता हॅाटेलमध्ये चहा देखील घेत नव्हता. २०१४ नंतर अनेकवेळा मी सांगोल्याचा दौरा केला. परंतु ही व्यक्ती मला कधीच भेटली नाही किंवा काही सांगितले नाही. कोण जेवल,कुणी पाठवल या बाबत मला काही माहिती नाही. हा सर्व प्रकार झाला तेव्हा संपुर्ण मिडीया तिथे होता. या प्रकरणाचा शोध घेतला तर अशोक शिंगारे मोठा गुन्हेगार असल्याचे कळले. अशोक शिंगारेवर २०२०मध्ये कर्नाटकातुन सोने चोरीचा गुन्हा दाखल आहे. तसेच वाळू माफिया,दारु विक्रेता असे सात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाच्या सुत्रधाराचा शोध घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला.त्या व्यक्तीला कुणाचे फोन आले, अटक केल्यावर कोणी संपर्क साधला याचा पोलिसांनी रेकार्ड काढुन शोध घेणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी कॅंाग्रेसचा मोठा नेता आहे. त्या नेत्यानेच या व्यक्तीला तू फक्त असं बोलत राहा आम्ही शूटींग करुन पसरवतो असे सांगितले. टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या टोमॅटोला सांगतो अस षडयंत्र रचून सदाभाऊंचा आवाज दाबता येणार नाही. या प्रकरणाचा शोध मला लागला पण पोलिसांना का लागला नाही असा प्रश्न त्यांनी केला.

सरकारी समितीच्या दौर्‍यावर असताना हा प्रकार घडला.त्यामुळे कलम ३५३ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करायला हवा होता तो केला नाही. रात्री ९ वाजेपर्यंत आनंद कुलकर्णी गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता याचा शोध घ्यावा लागेल असे खोत म्हणाले. राष्ट्रवादीकडून मला सतत धमकवण्याचे हल्ला करण्याचे प्रकार होत असतात. याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडे करणार आहे.रयत क्रांती संघटना याचा नक्की मुकाबला करेल असेही ते म्हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री