मुंबईत अल्पवयिन मुलीवर बलात्कार प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते
महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर वयाची साठी ओलांडलेल्या व्यक्तीकडून अत्याचार, पोलिसांनी केली अटक

पोलिसांसह न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या फिरत्या पथकाने घटनास्थळी भेट दिली

Swapnil S

नांदेड : अर्धापूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना शुक्रवारी (दि. ८) घडली. एका आठ वर्षीय चिमुकलीवर साठी ओलांडलेल्या व्यक्तीने अत्याचार केल्याप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

अर्धापूर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला त्याच गावातील साठी ओलांडलेल्या व्यक्तीने अत्याचार केल्याची केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. पीडितेने आपल्या आईला झालेली घटना सांगितली. तिच्या आईने दिलेला फिर्यादीवरून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांसह न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या फिरत्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरली व आरोपीला‌ अटक केली आहे. पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक म्हस्के करत आहेत.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या