विशाल अग्रवालला दणका 
महाराष्ट्र

विशाल अगरवाल यांच्यासह पाच जणांविरुद्ध मोफाअंतर्गत गुन्हा दाखल

Swapnil S

पुणे : कल्याणीनगर येथे झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल यांच्यासह पाचजणांविरुद्ध सदनिकाधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र सदनिका मालकी हक्क कायद्यान्वये (मोफा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विशाल अरुण अडसूळ (वय ४१, रा. नॅन्सी ब्रह्मा रेसिडन्सी को-ऑप हाऊसिंग सोसायटी, बावधन,पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल सुरेंद्र अगरवाल, रामकुमार अगरवाल, विनोदकुमार अगरवाल, नंदलाल किमतानी, अशिष किमतानी यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध फसवणूक, तसेच मोफा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००७ बावधन येथे बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रह्मा को-ऑप. हाऊसिंग सोसायटीत ७१जणांनी सदनिका खरेदी केली. सोसायटीच्या मालकीची मोकळी जागा (ॲमेनिटी स्पेस, पार्किंग) आहे. मोकळ्या जागेच्या नकाशात फेरबदल मंजूर करण्यात आले. नॅन्सी ब्रह्मा सोसायटीच्या सभासदांची परवानगी न घेता बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल तसेच साथीदारांनी सोसायटीच्या जागेतील अकरा मजली इमारत बांधून तेथे ६६ कार्यालये (ऑफिस स्पेस) बांधली. दहा मजली इमारतीत २७ सदनिका, १८ दुकाने बांधली. सोसायटीत सभासदांची फसवणूक केली, असे अडसूळ यांनी फिर्यादीत सांगितले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ पुढील तपास करत आहेत.

विशाल, शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, या प्रकरणातील शिवानी अग्रवाल आणि अश्फाक मकानदार या तिघांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालचा मुलाचे रक्ताचे सॅम्पल कुठे फेकले? ते सॅम्पल नेमके कुणी फेकले? यात अजून कोणी सहभागी आहेत का? याची माहिती घेण्यासाठी तसेच केसच्या मुळाशी जाणे गरजेचे नाहीतर चुकीचा संदेश जाईल, असं सांगत पोलिसांनी या तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली. ही कोठडी वाढवून देण्यात आली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस