महाराष्ट्र

"मासे खाल्ल्याने मुली लवकर पटतात, ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिचे डोळे सुंदर ", मंत्री विजय कुमार गावितांचं वादग्रस्त विधान

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे.

Rakesh Mali

राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ते चांगलेच चर्तेत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका केली जात असून यामुळे नवा उद्भवण्याची शक्यता आहे. मासे खाल्ल्याने स्त्रियांचं सौंदर्य खुलतं तसंच डोळे सुंदर होतात आणि त्यामुळे मुली लवकर पटतात असा जावईशोध गावित यांनी लावला आहे. धुळ्यातील आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

मासे खाल्ल्याने डोळ सुंदर होतात आणि मुली लवकर पटतात असं विधान करताना त्यांनी अभिनेत्री एश्वर्या रायचं उदाहरण दिलं आहे. ऐश्वर्या राय मासे खायची म्हणूत तिची त्वचा आणि डोळे सुंदर आहे, असं विजय कुमार गावित यांनी म्हटलं आहे.

मंत्री गावित म्हणाले की, मासे खाल्ल्याने दोन फायदे मिळतात. मासे खाल्ल्यावर स्त्रिया सुंदर दिसतात तसंच नियमित मासे खाल्ल्याने डोळ्यांचं सौंदर्य वाढतं. ऐश्वर्या राय समुद्राच्या किनारी राहणारी आहे. ती बंगळूरुची आहे. ऐश्वर्या राज दरोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. तुम्ही देखील दररोज मासे खाल्ले तर तुमचे डोळे देखील तिच्यासारखे सुंदर होऊ शकतात. माशांमध्ये एकप्रकारं ऑईल असतं, त्यामुळे डोळे आणि त्वचा चांगली राहते. असं गावित म्हणाले.

धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचं साहित्य वाटपाचा कार्यक्रमात बोलताना गावित यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांना आक्षेप घेतला असून यामुले नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

गिलचा पुन्हा शतकी नजराणा; चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर

जुलै महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल