महाराष्ट्र

माझ्या डोळ्यादेखत अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत!आई आशा पवार यांनी व्यक्त केली इच्छा

अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे. डेंग्यूमुळे आजारी असलेले अजित पवार मात्र मतदानासाठी येऊ शकले नाहीत.

नवशक्ती Web Desk

बारामती : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करायला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी ‘‘माझ्या देखतच अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं” अशी इच्छा सर्वांसमोर बोलून दाखवली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली आहे. डेंग्यूमुळे आजारी असलेले अजित पवार मात्र मतदानासाठी येऊ शकले नाहीत.

अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मातोश्री आशाताई पवार यांनी रविवारी सकाळी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यानंतर आशा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी आशा पवार यांना अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रतिक्रिया विचारली. यावेळी त्या म्हणाल्या, ‘‘दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं, असे वाटते. दादावर लोकांचे प्रेम आहे, पण पुढचं काय सांगता येतं? सर्वांना वाटतं की, दादाने मुख्यमंत्री व्हावे. मी आता ८६ वर्षांची आहे. त्यामुळे माझ्या डोळ्यादेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते. कोणास ठाऊक इच्छा पूर्ण होईल की नाही, असे भावनिक विधान आशा पवार यांनी केले.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस